तब्बल ८ हजार किलोमीटर अंतर पायी कापून नाशिकचा तरुण हज यात्रेवरून परतला! पाकने व्हिसा नाकारल्यामुळे इराणहून केला प्रवास
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तब्बल ८ हजार किलोमीटर अंतर पायी कापून नाशिकचा तरुण हज यात्रेवरून परतला! पाकने व्हिसा नाकारल्यामुळे इराणहून केला प्रवास

तब्बल ८ हजार किलोमीटर अंतर पायी कापून नाशिकचा तरुण हज यात्रेवरून परतला! पाकने व्हिसा नाकारल्यामुळे इराणहून केला प्रवास

Published Jul 14, 2024 09:56 AM IST

Nashik man returns after completing Hajj on foot : नाशिक येथील साइनबोर्ड चित्रकार सय्यद अली शाहबाज यांनी तब्बल हज यात्रेचा तब्बल ८ किमीचा पायी प्रवास करून परत मायदेशी आले आहे.

तब्बल ८ हजार किलोमीटर अंतर पायी कापून नाशिकचा तरुण हज यात्रेवरून परतला! पाकने व्हिसा नाकारल्यामुळे इराणहून केला प्रवास
तब्बल ८ हजार किलोमीटर अंतर पायी कापून नाशिकचा तरुण हज यात्रेवरून परतला! पाकने व्हिसा नाकारल्यामुळे इराणहून केला प्रवास

Nashik man returns after completing Hajj on foot : नाशिक येथील साइनबोर्ड चित्रकार सय्यद अली शाहबाज यांनी तब्बल हज यात्रेचा तब्बल ८ किमीचा पायी प्रवास करून परत मायदेशी परत आले आहे. साइनबोर्ड चित्रकार सय्यद अली शाहबाज (वय ४५) यांनी गेल्या वर्षी हज यात्रेचा प्रवास सुरू केला होता, ३ जुलै २०२३ रोजी त्यांनी नाशिकच्या बडी दर्गा येथून त्यांचा हज यात्रेचा प्रवास सुरू केला होता.

सय्यद हा तब्बल ८ हजार ६० किलोमीटर अंतर पायी कापत हज यात्रेसाठी निघाला होता. वर्षभराच्या खडतर प्रवासानंतर तो ३ जून २०२४ ला मक्का येथे पोहोचला. त्यानंतर १६ जून २०२४ पासून होणाऱ्या हज यात्रेत तो सहभागी झाला. या प्रवासादरम्यान त्याने रोज २५ किलोमीटर अंतर पायी कापले. तर कधी कधी या पेक्षाही जास्त अंतर त्याने कापले. या प्रवासादरम्यान, त्याने देशातील अनेक राज्ये ओलांडून दिल्ली तेथून पुढे इराण, इराक, करबलानंतर कुवेत आणि शेवटी सौदी अरेबियात तो पोहोचला. यता प्रवासाच्या परवानगीसाठी त्याला नवी दिल्लीतील दूतावासात फेऱ्या माराव्या लागल्या. त्याच्या या प्रवासाठी त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेकांनी मदत केली.

पंचवटी नाशिक येथे राहणाऱ्या शाहेबाज याची वयाच्या २१ वर्षी पासून हज यात्रेला जाण्याचे स्वप्न होते. २००३ मध्ये त्याने सायकलने अजमेर तीर्थयात्रा केली. यानंतर त्याने पायी हज यात्रा करायचे ठरवले. २०१९ मध्ये त्याने या यात्रेचे नियोजन केले.

या खडतर प्रवासाची तयारी करणे ही काही छोटी कामगिरी नव्हती. सय्यदला त्याचा मित्र सतीश शिवाजी जगताप याला मदत केली. जगताप यांनी तांत्रिक सहाय्य केले तसेच तीर्थयात्रा सुरळीत पार पडावी यासाठी त्याच्या प्रवासाचे नियोजन केले. याव्यतिरिक्त, शहेबाजचा भाऊ, सय्यद गुलाब शाहेबाज आणि इतर मित्रांनी स्थानिक, राज्य आणि केंद्र सरकारकडून आवश्यक परवानग्या मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीतून २,१०० किमी चालत शाहबाजचा प्रवास सुरू झाला. मुळात पाकिस्तानला जाण्याची योजना आखत असताना. पाकिस्तानने त्याचा व्हिसा रोखला, त्यामुळे त्याने त्याचा प्रवासाचा मार्ग बदलला, व दिल्लीहून इराणमधील मशहदपर्यंत त्याने विमान प्रवास केला. मशहद येथून, त्याने आपला पायी प्रवास पुन्हा सुरू केला. इराणमधून आणखी २,००० किमी त्याने पायी प्रवास केला. त्यानंतर इराकमार्गे १ हजार १०० किमी, सौदी अरेबियामध्ये प्रवेश करण्यासाठी रफाह बॉर्डरवर पोहोचण्यापूर्वी आणि अखेरीस मदीना कडे त्याने प्रवास सुरू केला.

त्याच्या संपूर्ण यात्रेत, शाहेबाजला असंख्य आव्हानांचा तोंड द्यावे लागले. दिवसभर चालत राहणे आणि रात्र पडल्यावरच आराम करणे. त्याच्या सोबत स्लीपींग बॅगसह खाद्य पदार्थ तो सोबत ठेवत असे. त्याने या प्रवासात अनेकदा पेट्रोल पंप, स्टेशन, पडक्या घरांवर किंवा कधी कधी रस्त्याच्या कडेला झोपून रात्र काढल्या. शारीरिक त्रास व अनेकदा आजारी पडून देखील त्याने जिद्दीने हा प्रवास पूर्ण केला.

“ज्या दिवशी गोष्टी अशक्य वाटत होत्या, तेव्हा मला नेहमी अनोळखी लोकांकडून मदत मिळायची. मी त्यांना गॉडसेंड मसिहा म्हणतो. मी खऱ्या अर्थाने ‘अंधा सफर’ला (अंध प्रवासाला) निघालो, प्रत्येक पावलावर अल्लाहवर भरवसा ठेवून, जसे संत मीराने सर्वस्व भगवान कृष्णाला अर्पण केले, तास मी प्रवास केला असे सय्यद म्हणाला.

१२ जुलै रोजी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर, साहेबाजचा प्रवास सुरूच आहे कारण तो मुंबईहून आपल्या मूळ गावी, नाशिकला परत जाण्याची योजना आखत आहे. “ही तीर्थयात्रा केवळ मक्का गाठण्यासाठी नव्हती. विश्वास आणि शुद्ध हेतूने, कोणतेही स्वप्न फार मोठे नसते हे सिद्ध करण्याबद्दल ते होते, असे सय्यद म्हणाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर