Nashik Viral News: नाशिक जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. मुलाच्या लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या एका व्यक्तीने स्वत:च तिच्याशी लग्न केल्याचा प्रकार घडला. यानंतर संबंधित व्यक्तीच्या मुलाने कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला असून तो संन्यासी झाल्याचे सांगितले जात आहे. नाशिक येथील या घटनेची संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचे लग्न ठरले. दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरू होती. दरम्यान, मुलाचे वडील आणि त्याची होणारी सून यांचे एकमेकांवर प्रेम जडले. यानंतर दोघांनीही लग्न केले. हे ऐकून सगळेच आश्चर्यचकीत झाले. याबाबत जेव्हा मुलाला कळाले, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. यानंतर त्याने कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्याला समजावण्याचे खूप प्रयत्न केले पण, त्याने कोणाचेही ऐकले नाही. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी दुसरी मुलगी शोधायला सुरुवात केली, पण त्याने स्पष्ट नकार देत सन्यास घेतल्याचे जाहीर केले.
मुलाच्या काही नातेवाईकांनी त्याला आता वडिलांपासून वेगळे राहून दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा सल्ला दिला. पण त्यासाठीही तो तयार झाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाने आपले घर आणि कुटुंब सोडले आहे आणि आता तो रस्त्यावर राहू लागला आहे.
चीनमधूनही असाच एक प्रकार समोर आला होता, जेव्हा एका मुलाने आपल्या प्रेयसीची त्याच्या वडिलांशी ओळख करून दिली आणि पहिल्याच भेटीत वडील आपल्या होणाऱ्या सुनेवर प्रेमात पडले. वडिलांनी आपल्या मुलाच्या मैत्रिणीला महागड्या भेटवस्तू पाठवून तिचे मन जिंकले आणि नंतर दोघांनी लग्न केले, असे सांगितले जात आहे.
संबंधित बातम्या