Nashik: नाशकात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik: नाशकात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

Nashik: नाशकात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

Sep 02, 2023 11:59 PM IST

Nashik Man Kills Wife: नाशिकच्या श्रीभुवन गावात चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने बायकोची हत्या केली.

crime. (Representative use)
crime. (Representative use) (HT_PRINT)

Nashik Man Kills Wife: नाशिकच्या श्रीभुवन गावात चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने बायकोच्या मानेवर कुऱ्हाड घातली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी पतीने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी आरोपीच्या मुलाने स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जयवंता दळवी (वय, ४७) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, मनोहर शिवाजी दळवी (वय, ५१) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचा मुलगा लक्ष्मणने दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी मनोहरला दारूचे व्यसन होते. मनोहर हा दररोज दारू पिऊन आल्यानंतर मयत जयवंता हिच्याशी वाद घालायचा. दरम्यान, ०१ सप्टेंबर २०२३ रोजी मनोहर नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. त्यावेळी जयवंता चुलीवर स्वयंपाक करीत होती. तेव्हा चारित्र्याच्या संशयावरून मनोहर आणि जयवंता यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्याने मनोहरने जयवंता मानेवर उजव्या बाजूला कुऱ्हाडीने वार करून घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. लक्ष्मणने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मनोहर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

पुणे: दारु पिताना झालेल्या वादातून तरुणाची हत्या

पुण्यातील हडपसर येथील रामटेकडी परिसरात दारून पिताना झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी (२ सप्टेंबर २०२३) मध्यरात्री उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर