Kasara Ghat Accident : कसारा घाटात टँकर २०० फुट दरीत कोसळल्याने पाच जण ठार; नाशिक-मुंबई महामार्गावरील घटना-nashik kasara ghat accident 5 dead tanker fell down into 200 feet deep valley ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kasara Ghat Accident : कसारा घाटात टँकर २०० फुट दरीत कोसळल्याने पाच जण ठार; नाशिक-मुंबई महामार्गावरील घटना

Kasara Ghat Accident : कसारा घाटात टँकर २०० फुट दरीत कोसळल्याने पाच जण ठार; नाशिक-मुंबई महामार्गावरील घटना

Aug 19, 2024 08:47 AM IST

Kasara Ghat Accident : नाशिक मुंबई महामार्गावर कासारा घाटात एक टँकर दरीत कोसळून पाचजण ठार झाले आहे. ही घटना रविवारी घडली.

Kasara Ghat Accident
Kasara Ghat Accident

Nashik Kasara Ghat Accident: नाशिक जिल्ह्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटात भीषण अपघात झाला आहे. घाटातील बलगर पॉइंटजळ ही घटना घडली. भरधाव वेगातील टँकर रस्त्यालगत असलेल्या लोखंडी जाळ्या तोडून थेट दरीत कोसळला. या अपघातात पाच नागरिक ठार झाले आहेत तर तिघे जण जखमी झाले आहेत. अपघात ठार झालेले व जखमी झालेले सर्व नागरिक ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहेत.

अपघातात विजय घुगे (वय ६०), आरती जायभावे (वय ३१), सार्थक वाघ (वय २०), चालक योगेश आढाव (वय ५०) आणि रामदास दराडे (वय ५०) अशी या अपघात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर अक्षय घुगे (वय ३०), श्लोक जायभावे (वय ५), अनिकेत वाघ (वय २१) असे जखमींचे नावे आहेत. अपघातातील जखमींना कसारा ग्रामीण रुग्णालयात भारती करण्यात आले असून त्यांकयावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक टँकर हा काही प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास टँकर घाटातील बलगर पॉइंटजळ आला असता यावेळी टँकरवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले सुटले. यामुळे रस्त्याशेजारी असलेले लोखंडी कठडे तोडून टँकर दरीत कोसळला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. या सोबतच आपत्ती व्यवस्थापन पथकाने देखील घटनास्थळी धाव घेतली. घाटात सुरू असलेल्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. आपत्ती व्यवस्थापन पथक, मृत्यूंजय दूत, लतिफवाडी येथील क्रेनचालक, महामार्ग पोलीस आणि कसारा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शर्थीने प्रयत्न केले.

दोरखंडाच्या मदतीने मृतदेह व जखमींना काढले बाहेर

टँकर हा खोल दरीत कोसळला होता. या टँकरचे अनेक तुकडे झाले होते. घाटात पुस सुरू असल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. बचाव पथकाने दरीत उतरून दोरखंडाच्या साह्याने मृतदेह व जखमी नागरिकांना बाहेर काढले. काही मृतदेह ही छिन्नविछिन्न झाल्याने त्यांची ओळख पटवने अवघड झाले होते. मृत व जखमी सिन्नर तालुक्यातील नेरळ आणि संगमनेर तालुक्यातील निमोण येथील आहेत. तर चालक हा कोपरगावचा रहिवासी आहे.