Nashik Hit and Run: पुणे, मुंबईनंतर नाशिकमध्येही हिट अँड रनची घटना, भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Hit and Run: पुणे, मुंबईनंतर नाशिकमध्येही हिट अँड रनची घटना, भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Nashik Hit and Run: पुणे, मुंबईनंतर नाशिकमध्येही हिट अँड रनची घटना, भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Updated Jul 10, 2024 12:43 PM IST

Nashik Hit and Run Car: नाशिकमध्ये भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला भीषण धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

नाशकात कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
नाशकात कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Nashik Accident: पुणे, मुंबईनंतर आता नाशिक येथेही हिट अँड रनची घटना घडली आहे. एका भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, संबंधित महिला हवेत उडून २० फूट दूर पडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. ही घटना मंगळवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली शिंदे (वय,३६) असे कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, वैशाली या रस्त्यावरून जात आहेत. तितक्यात एका पांढऱ्या रंगाची कार त्यांना धडक देते. या धडकेनंतर वैशाली या हवेत उडून १५ ते २० फूट दूर पडतात. महिलेला धडक दिल्यानंतर तिची मदत करण्याऐवजी वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर स्थानिकांनी वैशाली यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली.

मुंबई हिट अँड रन प्रकरणी मिहीर शाहला अटक

मुंबई बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील फरार आरोपी आणि शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शाह (वय, २४) याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. दोन दिवसांपूर्वी त्याने आपल्या लक्झरी कारने दुचाकीला धडक दिली, ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा पती जखमी झाला. रविवारी सकाळपासून पोलिसांपासून वाचण्यात यशस्वी ठरलेल्या मिहीर शहा याला मुंबईजवळील विरार येथून अटक करण्यात आली.मिहीर शहा ची आई आणि दोन बहिणींना ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यांच्यासह अन्य १० जणांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली.

महिलेला दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेले

दक्षिण-मध्य मुंबईतील वरळी भागात मिहीर शहा यांनी चालवलेल्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची घटना ७ जुलै रोजी सकाळी घडली. या धडकेत मागे बसलेल्या कावेरी नाखवा (वय,४५) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रदीप नाखवा जखमी झाले. कावेरी नाखवा यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने सुमारे दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर मिहिर घटनास्थळावरून पळून गेला, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर