मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik MLC Election : नगरमधील नेत्याचा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा; काँग्रेसनं घेतला मोठा निर्णय

Nashik MLC Election : नगरमधील नेत्याचा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा; काँग्रेसनं घेतला मोठा निर्णय

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 26, 2023 03:52 PM IST

vNana Patole sack Suresh Salunkhe from Congress : सत्यजीत तांबे यांना पाठिंबा जाहीर करणारे काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष सुरेश सांळुखे यांना पक्षातून निलंबिंत करण्यात आलं आहे.

Satyajeet Tambe - Nana patole
Satyajeet Tambe - Nana patole

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करणारे सत्यजीत तांबे यांना काही स्थानिक नेत्यांनी पाठिंबा दिल्याचं समजताच काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनं नगर जिल्हा ग्रामीण काँग्रेसची संपूर्ण कमिटीच बरखास्त केली आहे. तसंच, अहमदनगर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश साळुंखे यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसनं महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिलाय. मात्र, अहमदनगर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सुरेश साळुंखे यांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केल्याचं आम्हाला मीडियातून समजलं. या प्रकरणी त्यांना १७ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती व दोन दिवसांत खुलासा करण्यास सांगितलं होतं, परंतु ७ दिवसानंतरही त्यांनी खुलासा केला नाही. त्यामुळं पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. साळुंखे यांना २४ जानेवारी रोजीच निलंबित करण्यात आलंय. जिल्हा काँग्रेस कमिटीही बरखास्त करण्यात आली आहे, असं पटोले यांनी सांगितलं.

पुण्यातील पोटनिवडणुकीचा अंतिम निर्णय २ फेब्रुवारीला

पिंपरी चिंचवड व कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. या पोटनिवडणुकीबाबत निर्णय झालेला आहे, पण २ फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या नेत्यांची या विषयावर बैठक होणार आहे आणि या बैठकीत उमेदवारांसंदर्भात निर्णय होईल, असं पटोले म्हणाले.

WhatsApp channel