Nashik MIDC : सिन्नर एमआयडीसीतील काच कारखान्यात भीषण आग, बॉयलरचा स्फोट-nashik fire sinnar midc fire in glass manufacturing company hindustan limited boiler blast ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik MIDC : सिन्नर एमआयडीसीतील काच कारखान्यात भीषण आग, बॉयलरचा स्फोट

Nashik MIDC : सिन्नर एमआयडीसीतील काच कारखान्यात भीषण आग, बॉयलरचा स्फोट

Dec 29, 2023 11:05 PM IST

Nashik MIDC Fire : सिन्नर एमआयडीसीतील काचा तयार करणाऱ्या एका कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. यात संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे.

Nashik MIDC Fire
Nashik MIDC Fire

नाशिकमधील सिन्नरच्या माळेगाव औद्यागिक वसाहतीतील हिंदुस्तान ग्लास लिमिटेड या कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या कंपनीत काचा तयार केल्या जातात. स्फोटानंतर सिन्नर एमआयडीसीसह सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

बॉयलर फुटल्यामुळे स्फोट झाल्यानंतर ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. एमआयडीसीत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. सिन्नर एमआयडीसीसह सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिन्नर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील माळेगाव एमआयडीसीतील हिंदुस्तान ग्लास लिमिटेड कंपनीत काचा तयार केल्या जातात. यामध्ये बॉयलर फुटल्यानंतर मोठा स्फोट झाला व कंपनीत आग लागली. आग लागली त्यावेळी कामगार काम करत होते की नाही, तसेच आगीत कोणी अडकले आहे की, नाही याची माहिती मिळालेली नाही. कंपनीतून आगीचे प्रचंड लोळ बाहेर पडत असून परिसरात धूर पसरला आहे. 

नवी मुंबईतील केमिकल कारखान्याला आग

तळोजा येथील एका केमिकल कारखान्याला गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केम्सपॅक केमिकल लिमिटेड कंपनीला आग लागली. ही कंपनी सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना कच्चा माल पुरवते. कंपनीत उत्पादन घेण्याचे काम सुरू असताना कंपनीच्या पावडर प्लान्टला आग लागली. संपू्ण कंपनीत आग पसरल्याने कामगार जीव मुठीत धरून बाहेर पडले, ज्यामुळे मोठी जिवीतहानी टळली.

Whats_app_banner
विभाग