मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Shocking: नाशिक येथील दुर्दैवी घटना, विजेच्या धक्क्याने बाप- लेकाचा मृत्यू

Nashik Shocking: नाशिक येथील दुर्दैवी घटना, विजेच्या धक्क्याने बाप- लेकाचा मृत्यू

Mar 15, 2023 04:29 PM IST

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे वीजेचा धक्का लागल्याने बाप- लेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Crime (Representative Use)
Crime (Representative Use) (HT_PRINT)

Nashik: नाशिकच्या मालेगाव येथे वीजेच्या धक्का लागल्याने बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत मुलगा विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेला असता त्याला विजेच्या तारेचा स्पर्श झाला. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांनाही विजेच्या तारेचा स्पर्श झाला. यात बाप-लेकांचा मृत्यू झाला आहे. एकाच वेळी बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग कळमकर आणि समाधान कळमकर अशी मृतांची नावे आहेत. पांडुरंग यांची खडकी शिवारात शेतजमीन आहे. मंगळवारी पंडुरंगसह कुटुंबांसह कांदा काढणीसाठी शेतात गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा समाधान विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेला असता त्याला वीजेचा धक्का लागला. हा प्रकार पाहिल्यानंतर पांडुरंग हे समाधान वाचवण्यासाठी पळाले. मात्र, मुलाला वाचवताना पांडुरंग यालाही विजेच्या धक्का लागला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी जोरजोरात आरडाओरड केला. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी बाप- लेकाला मृत घोषित केले.

पालघर: अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

पालघरमध्ये सोमवारी मध्यरात्री अंगावर वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. नाना चव्हाण असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील कांद्याचे नुकसान होऊ नये म्हणून ते शेतात गेले होते. परंतु, त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग