Nashik Water Cut : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नाशिकमध्ये जलवाहिनी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणाऱ्या असल्याची माहिती महापालिकेतील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.यामुळे नाशिककरांवर पाण्याचे संकट ओढवले असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणातून शहरात येणारी ७०० मिलीमीटरची व्यासाची जलवाहिनी सोमवारी फुटली. परिणामी प्रभाग क्रमांक सात, आठ, नऊ आणि १२ येथील पाणी पुरवठा ठप्प झाला. नाशिक महानगरपालिकेने तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र, या कालावधीत नाशिककरांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील बळवंत परिसरातील जलवाहिनी फुटल्याने महापालिकेच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी किती वेळ लागेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, अशी सूचना नाशिक महापालिकेकडून करण्यात आली.
नाशिक शहराला मुकणे धरणातूनही पाणी पुरवठा केलाा जातो. त्यामुळे सिडको, इंदिरानगर आणि पाथर्डी या परिसरातील पाणीपुरवठा सुरु राहिल. पण सातपूर, पश्चिम आणि पूर्व नाशिकचा काही भागात पाणीपुरवठा बंद राहील.
नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुढील २८ दिवस पुरेल इतकाच पाणीपुरवठा शिल्लक आहे. धरण परिसरात येत्या आठ दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावा लागण्याची शक्यता आहे. नाशिककरांना गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या तिन्ही धरणांत केव ५४८ दशलक्ष पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या शहराला दररोज १९.५६ धनफुट पाणी पुरवले जाते. यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय आणि अतिवापर टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या