Nashik: वीजेच्या तारांमध्ये पंतग अडकल्याची पाहिले, काढायला गेला अन् आयुष्याची दोर तुटली!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik: वीजेच्या तारांमध्ये पंतग अडकल्याची पाहिले, काढायला गेला अन् आयुष्याची दोर तुटली!

Nashik: वीजेच्या तारांमध्ये पंतग अडकल्याची पाहिले, काढायला गेला अन् आयुष्याची दोर तुटली!

Jan 15, 2024 01:02 PM IST

Nashik electric Shock News: नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात असलेल्या नरहरीनगर येथे वीजेचा धक्का लागल्याने शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Electric Shock (Representative Image)
Electric Shock (Representative Image)

15 Year Old Boy Dies of electrocution in Nashik: नाशिकमध्ये वीजेच्या तारेला अडकलेला पंतग काढताना वीजेचा धक्का लागल्याने शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१४ जानेवारी) दुपारी पाथर्डी फाटा भागात असलेल्या नरहरीनगर येथे घडली. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी अशी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

भाग्येश विजय वाघ (वय, १५) असे वीजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. भाग्येशचे वडील पोलीस खात्यात कार्यरत आहेत. वाघ आपल्या कुटुंबासोबत रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गावावरून आले. भाग्येश त्यांच्यासोबत होता. त्यावेळी घराच्या छतावरील विजेच्या तारांमध्ये पतंग अडकल्याचे भाग्येशने पाहिले. तो घरात न जाता पतंग घेण्यासाठी छतावर धावला.

त्यानंतर त्याने जवळच पडलेल्या पडद्याच्या लोखंडी रॉडने पतंग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला वीजेचा जोरदार धक्का लागला. भाग्येशला वीजेचा धक्का लागल्याची माहिती नातेवाईकांना कळताच ते छतावर पोहोचले. त्यांनी त्वरीत तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. भाग्येश स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता.

मुंबई: पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने एकाचा गळा चिरला

मुंबईच्या विलेपार्ले पूर्व पश्चिम महामार्गावर पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने एका व्यक्तीचा गळा कापून त्याला गंभीर दुखापत झाली. जालिंदर भगवान नेमाने (वय, ४१) असे पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जालिंदर नेमाने हे सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नोकरी करतात. कामावरून घराच्या दिशेने जाताना पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पुलावर पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर