मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik: दिव्यांग मामावर कोयत्यानं वार; त्यानंही मेला नाही म्हणून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं

Nashik: दिव्यांग मामावर कोयत्यानं वार; त्यानंही मेला नाही म्हणून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं

Sep 16, 2023 09:20 PM IST

Nashik Murder: नाशिकच्या वणी येथे किरकोळ वादातून मामाची हत्या केल्याप्रकरणी भाच्याला अटक करण्यात आली.

Nashik Murder
Nashik Murder

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ सप्टेंबर रोजी दिव्यांग व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले असून एका व्यक्तीने किरकोळ वादातून मामाची हत्या केल्याची चौकशीत उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप हरी मेधने (वय, ४१) असे हत्या झालेल्या अंपग व्यक्तीचे नाव आहे. तर, किरण शरद कदम (वय, २०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, ११ सप्टेंबरला मयत आणि आरोपी एकमेकांसोबत दारू प्यायले. त्यावेळी किरकोळ कारणांवरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने आरोपीने संदीप यांच्यावर कोयत्याने वार केले. मात्र, एवढ्याने संदीप मरणार नसल्याचे समजताच आरोपीने अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. यानंतर आरोपी आणि त्याचा एक साथीदार घटनास्थळावरून पसार झाले.

दरम्यान, ११ सप्टेंबर रात्री उशीरा एका दिव्यांग व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी मयताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. परंतु, मृताचा चेहरा जळल्याने पोलिसांना त्याची ओळख पटवणे मोठे आव्हान होते.

ट्रेंडिंग न्यूज

पोलीस तपासादरम्यान मृतक आणि आरोपी सोबत दारू प्यायल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपी किरणला आपल्या ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला आरोपीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने हत्येची कबूली दिली.

WhatsApp channel
विभाग