सतत आजारी राहत असल्यानं नराधम बापाची ५ वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण; उलटं लटकवलं आणि…
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सतत आजारी राहत असल्यानं नराधम बापाची ५ वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण; उलटं लटकवलं आणि…

सतत आजारी राहत असल्यानं नराधम बापाची ५ वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण; उलटं लटकवलं आणि…

Published Oct 09, 2024 08:56 AM IST

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नराधम बापाने आपल्या पोटच्या पाच वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण केल्याचं उघड झालं आहे.

सतत आजारी राहत असल्यानं नराधम बापाची ५ वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण; उलटे लटकावून केलं असं काही की....
सतत आजारी राहत असल्यानं नराधम बापाची ५ वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण; उलटे लटकावून केलं असं काही की....

Nashik Crime : वडील आणि मुलाचं नातं अतूट असतं. मुलाच्या काळजीसाठी आईवडील काहीही करायला तयार असतात. मात्र, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगा सतत आजारी असल्याने त्याला उलटं टांगून अमानुषपणे मारहाण करण्यात आले आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा अघोरी विद्या करत असल्याचा संशय असून त्यातून देखील ही घटना घडल्याचा संशय आहे. पोलिस तया दृष्टीने तपास करत आहेत.

मंगेश नंदू बेंडकुळे असे निर्दयी आरोपी बापाचे नाव आहे. त्याच्या याच्या विरोधात वडनेर भैरव पोलिसांमध्ये आईने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगेश नंदू बेंडकुळे हे चांदवड तालुक्यात एका गावात राहतात. त्यांना एक पाच वर्षांचा मुलगा आहे. तो सतत आजारी असतो. 

तो वारंवार आजारी पडत असल्यानं या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, दवाखान्याचा खर्च परवडत नसल्याने मंगेश नंदू बेंडकुळेने आपल्या पाच वर्षांच्या मुलाला संतापाच्या भरात अमानुषपणे मारहाण केली. आईने आपल्या मुलाला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, नराधम बाप काही मानला नाही. त्याने मुलाला उलटे लटकवत मारहाण केली.

अघोरी कृत्याचाही संशय

ही घटना कौटुंबिक वादातून आणि अघोरी कृत्यातून केली असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आरोपी हा बुवाबाजी करत असल्यानं त्याने मुलाला उलटे टांगून मंत्रोपचार करून त्याला बरे करण्यासाठी अघोरी प्रकार केल्याचा संशय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केला आहे. मुलाच्या सततच्या आजारपणाला कंटाळून मुलाला मारहाण करणाऱ्या या बापाला कठोर शिक्षा करण्याची मागणी मुलाच्या आईने केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर