बदलापूरमध्ये एका शाळेतील शिशू वर्गाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार तसेच, पुणे व अकोल्यात शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर आल्याने राज्यात खळबळ माजली आहे. त्यातच आता नाशिक जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या ओझर इथे ही धक्कादायक घटना समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुलीचा सावत्र बाप आहे. त्याने १२वर्षाच्या चिमुरडीवर उसाच्या शेताच नेऊन अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी सावत्र बापावर विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१२ वर्षाच्या पीडितेनं धक्कादायक प्रकार सांगितला आहे.
पीडितेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसारसावत्र वडिलांनी तिला शेळ्या-बकऱ्या चरायला नेण्याच्या बहाण्याने उसाच्या शेतात नेलं. उसाच्या शेतात खूप आतमध्ये नेल्यानंतर त्याने मुलीला कपडे काढायला लावले. आरोपी तिला म्हणाला की, तूला मोठं झाल्यावर हे सगळं करायचं आहे. त्यानंतर मुलीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीनं तिच्या हाताला पकडून शेतात ओढत नेलं व लैंगिक अत्याचार केला.
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सावत्र बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे ओझर परिसरात खळबळ उडाली आहे. बदलापूर, पुणे, नाशिकच्या सिन्नर, अकोला आणि आता नाशिकच्या ओझरमध्ये चिमुकल्या मुलींवर अत्याचर होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने ६ मुलींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नराधम शिक्षकाने अश्लील व्हिडीओ दाखवून मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रमोद सरदार असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याच्यावर मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून हा शिक्षक ८ वीच्या मुलींना अश्लिल व्हिडिओ दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता तर त्यांच्या सोबत अश्लिल बोलतही होता. ही बाब पीडित मुलीनी घर सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला.