सतत होणाऱ्या वादातून सख्ख्या थोरल्या भावानेच धाकट्या भावाची चाकून भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मालेगावातील नूरबागमध्ये घडली आहे. सततच्या भांडणामुळे थोरल्या भावाने धाकट्या भावाचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मृताच्या मोठ्या भावाला अटक केली आहे.
जाविद अहमद मोहम्मद जमील (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर आरोपीचे नाव मुद्दसीर अहमद मोहम्मद जमील असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगावातून सख्ख्या भावानेच चाकूने भोकसून २३ वर्षीय लहान भावाची हत्या केली. संशयित मोठा भाऊ मुद्दसीर अहमद मोहम्मद जमील व मृत जाविद यांच्यात सतत भांडणे होत होती. या वादातूनच मुद्दसीरने जाविदचा खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित मुद्दसीरला अटक केली आहे. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
कोपर्डी बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने तुरुंगात आत्महत्या केली आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात आरोपी पप्पू शिंदेने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात कोर्टाने मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर आता यातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे यांने पुण्यातील येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. त्यामुळं पुण्यात खळबळ उडाली आहे.