Nashik Nifad crime news : राज्यात मुली आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटना सुरूच आहे. कल्याण आणि पुण्यामधील घटना ताज्या असतांना आता नाशिकच्या निफाड येथे एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीने बुधवारी निफाड आणि आडगाव पोलिस ठाण्यात सहा ते सात तरुणांविरोधात तक्रार दाखल केली असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ५ संशयितांना अटक करण्यात अलायी आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारी नुसार ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली आहे. या तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना पीडित तरुणीची एकाशी ओळख झाली होती. यानंतर या तरुणीला दोन वर्षांच्या कालावधीत विविध ठिकाणी नेत दोघांनी व त्यांच्या मित्रांनी अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार तपास करत असून तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना सामूहिक बलात्कार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ही तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. यावेळी पीडित तरुणीवर गेल्या दोन वर्षात विविध ठिकाणी दोघांनी अत्याचार केला. पीडित तरुणी व संशयित यांच्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ओळख झाली होती.
जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधन परिसरात फिरण्यासाठी आलेला पिंपरीतील तरुणाचा तोल गेल्याने तो दरीत पडला. यामुले त्याचा मृत्यू झाला. विकी राठोड असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पिंपरीत राहण्यास आहे. राठोड व त्याचे मित्र जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी कल्याण दरवाजा परिसरात खडकाळ भागावर तो थांबला असतांना त्याचा तोल गेला व तो खाली दरीत पडला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. शिवनेरी रेस्क्यू पथकाने त्याचा मृतदेह किल्ल्यावरुन खाली आणला. राठोड हा तळेगाव दाभाडे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
संबंधित बातम्या