मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik murder : दारू पिताना जिगरी दोस्तांमध्ये उफाळला वाद, दगडानं ठेचून केली युवकाची हत्या; नाशिक येथील घटना

Nashik murder : दारू पिताना जिगरी दोस्तांमध्ये उफाळला वाद, दगडानं ठेचून केली युवकाची हत्या; नाशिक येथील घटना

Jun 16, 2024 12:44 PM IST

Nashik Crime News : नाशिक येथे गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहे. येथील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू पितांना झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

 दारू पिताना जिगरी दोस्तांमध्ये उफाळला वाद, दगडानं ठेचून केली युवकाची हत्या; नाशिक येथील घटना
दारू पिताना जिगरी दोस्तांमध्ये उफाळला वाद, दगडानं ठेचून केली युवकाची हत्या; नाशिक येथील घटना

Nashik Crime News नाशिक येथे गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहे. येथील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू पितांना झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना मेरी रासबिहारी लिंकरोडवर औदुंबर लॉन्सच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत शनिवारी रात्री घडली. आरोपींनी एका रिक्षा चालक तरुणाची दगडाने ठेचुन हत्या केली.

ट्रेंडिंग न्यूज

प्रशांत तोडकर (वय २८, रा. रामवाडी) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फरार आहेत. या घटनेचे वृत्त असे की, खून झालेला प्रशांत तोडकर हा रिक्षा चालक आहे. तो नाशिकच्या सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. दरम्यान, शनिवारी रात्री तो त्याच्या मित्रांसोबत दारू पिण्यासाठी मेरी रासबिहारी लिंकरोडवर औदुंबर लॉन्सच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बसला होता. यावेळी कोणत्या तरी कारणावरून त्याचा आणि त्याचा मित्रांचा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने त्याच्या मित्रांनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. यानंतर आरोपी तेथून फरार झाले.

या घटनेची माहिती पोलिसांना रात्री उशिरा कळली. या खुनाच्या घटनेनंतर आणखी एकाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रशांतचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठवला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी डॉग स्कॉड पाचारण केले होते. तर घटनास्थळी काही पुरावे मिळतात का याचा देखील पोलिस तपास घेत आहे. तसेच प्रशांतचा खून नेमका कुणी केला याचा तपास पोलिस घेत आहेत. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये आज सकाळी देखील पंचवटीमध्ये एका मंदिरासमोर एका पोत्यात मानवी कवट्या आणि हाडे सापडल्याने खळबळ उडाली होती. एरंडवाडीमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन याची पाहिणी केली असता ही हाडे प्लॅस्टिकची असल्याचे उघड झाले. पोलिसांनी हे पोते ताब्यात घेतले आहे.

WhatsApp channel
विभाग