Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Published May 06, 2024 12:44 PM IST

Nashik bank loot crime : नाशिक येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या जुना गंगापूर नाका शाखेत चोरट्यांनी दरोडा टाकला असून ५ कोटींचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे.

नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास; व्हिडिओ व्हायरल

Nashik Bank loot Crime: नाशिक येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या जुना गंगापूर नाका शाखेत चोरट्यांनी दरोडा टाकला असून ५ कोटींचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहे. चोरट्यांनी या बँकेतील तब्बल २२२ ग्राहकांचे सेफ्टी लॉकर फोडले असून यातून हे दीड किलो वजनाचे दागिने चोरले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच बँकेच्या सुरक्षा प्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही घटना सिसिटीव्ही कैद झाली असून चोरटे चावीच्या साह्याने लॉकर उघडतांना दिसत आहे.

Baramati loksabha Election: बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्याचे वाटप; अधिकारी केंद्राकडे रवाना; पाहा फोटो

नाशिक येथे जुना गंगापूर नाका परिसरात आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीचे कार्यलाय आहे. या ठिकाणी अनेकांनी आपले सोन्याचे दागिने बँकेच्या सेफ्टी लॉकर मध्ये ठेवले आहे. तब्बल २२२ ग्राहकांचे १३,३८५.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने या लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, काही शनिवारी एक ग्राहक त्याचे सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी बँकेत आले होते. त्यांनी त्यांचे लॉकर उघडले असता त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या लॉकरमध्ये त्यांना त्यांचे सोन्याचे दागिने दिसले नाही. ही बाब त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना सांगितल्याने खळबळ उडाली.

Viral News : 'या' मुली बलात्कार करण्यास योग्य नाही! शाळेतील मुलांनी बनवलेली मुलींची यादी व्हायरल झाल्याने खळबळ

बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब बँकेचे व्यवस्थापक रणजित देशमुख यांना दिली. व्यव्यवस्थापक रणजित देशमुख यांनी जयेश कृष्णदास गुजराथी यांना या बाबत तातडीने माहिती दिली. त्यांनी बँकेच्या सर्व लॉकरची पाहणी केली. मात्र, कोणत्याच लॉकरमध्ये दागिने नसल्याचे आढळल्याने खळबळ उडाली. गुजराथी यांनी तातडीने पोलीसांत धाव घेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Eye Care Tips: उष्णतेमुळे डोळ्यात जळजळ होते का? आराम मिळवण्यासाठी फॉलो करा हे उपाय

दरम्यान, बँकेचे सीसीटीव्ही तपासले असता यात चोरटा लॉकर उघडतांना दिसत आहे. आरोपीने फायनान्स शाखेच्या बिझनेस व्यवस्थापक कार्यालयाची खिडकी उघडून बँकेत प्रवेश केला. यानंतर सेफ्टी लॉकरच्या किल्ल्या घेऊन त्याने सर्व लॉकर उघडून दीड किलोचे सोन्याचे दागिने लांपास केले.

ओळख लपवण्यासाठी घातली पीपीई किट

चोरांनी त्यांचा चेहरा आणि ओळख समजू नये यासाठी कोरोना काळात वापरल्या जाणाऱ्या पीपीई किट वापरल्या. त्यांच्या चेहेऱ्यावर मास्क आणि डोक्यावर माकड टोपी होती. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून या घटनेत आजी-माजी कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. लॉकरच्या चाव्या चोरांना कशा मिळाल्या? हा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर