नाशिक हादरले! घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन्...
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नाशिक हादरले! घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन्...

नाशिक हादरले! घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन्...

Jan 07, 2025 02:17 PM IST

Nashik News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात मुलाचे लग्न कार्य असताना आई वडिलांनी टोकाचं पाऊल उचलतं जिवन संपवलं आहे.

नाशिक हादरले! घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असतांना आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन्...
नाशिक हादरले! घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असतांना आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन्...

Nashik News : नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील झाडाला एका महिलेने गळफास घेत जीवन संपवलं होतं. ही घटना ताजी असतांना आता एका जोडप्याने राहत्या घरी विष प्राशन करून जिवन संपवलं आहे. विशेष म्हणजे या जोडप्याच्या मुलाची लग्नाची तयारी घरी सुरू होती. मात्र, त्या पूर्वीच दोघांनी जिवन संपवलं आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं हे समजू शकले नाही.

जयेश शहा आणि रक्षा शहा असे आत्महत्या करणाऱ्या जोडप्याचे नाव आहे. हे दाम्पत्य नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात राहत असून त्यांच्या लहान मुलाचा लग्न सोहळ्याची तयारी सुरू होती. हे लग्न अवघ्या २० दिवसांवर होते. मात्र, सोमवारी शहा यांनी आपल्या मुलासोबत जेवण करून रात्री विष सेवन करून जिवन संपवलं.

रात्री मुला सोबत जेवण केलं अन्

मिळालेल्या माहितीनुसार जयेश शहा आणि रक्षा शहा हे काल रात्री त्याच्या मुला सोबत जेवले. सर्व जण आनंदात होते. मात्र, रात्री दोघेही खोलीत गेल्यावर त्यांनी विष प्राशन केलं. रात्री ११ वाजता घरच्यांना त्यांनी विष प्राशन केलं असल्याचं समजलं. त्यांनी तातडीने त्यांना दवाखान्यात भरती केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आई वडिलांच्या मृत्यूमुळे मुलाना व घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, त्यांच्या खोलीत कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी घरात लग्न कार्य असतांना हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यांचा व्हीसेरा राखून ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हलहळ व्यक्त केली जात आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर