Nashik Ambad Suicide News: नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यात आज सकाळी धक्कादायक घटना घडली. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. नजन यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे सहायक प्रशांत बच्छाव यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक नजन हे सकाळी त्यांच्या कॅबिनमध्ये बसले होते. त्यावेळी अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला. यानंतर ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कॅबिनच्या दिशेने धाव घेतली. यावेळी नजन यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ माजली.
अशोक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालायात पाठवण्यात आला.अशोक नजन यांच्या कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली.या घटनेनंतर अशोक यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नजन यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा घालून तिची हत्या केली. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात जेऊर पाटोदा शिवारात सोमवारी घडली. पूजा अरुण दाभाडे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या