मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून कार थेट गोदावरी नदीत कोसळली

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून कार थेट गोदावरी नदीत कोसळली

Jul 06, 2024 03:36 PM IST

Nashik Accident :गोदावरी नदीवरील पुलाचे कठडे तोडून भरधाव कार नदीपात्रात कोसळली. या अपघातात एक जण ठार झाला आहे, तर दोन तरुण जखमी झाले आहेत. गंगापूर धरण परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

नाशिकमध्ये कारचा भीषण अपघात
नाशिकमध्ये कारचा भीषण अपघात

Nashik Car Accident : नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुलावर एक भीषण अपघात झाला असून यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गोदावरी नदीवरील पुलाचे कठडे तोडून भरधाव कार नदीपात्रात कोसळली. गंगापूर धरण परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. कारमधून तीन जण प्रवास करत होते, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात नितीन कापडणीस या तरुणाचा मृत्यू झाला आहे. किरण कदम व योगेश पानसरे अशी गंभीर जखमी असलेल्या तरुणांची नावे आहेत. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या गंमत जंमत हॉटेलजवळ रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात झाला. भरधाव कार थेट नदीवरील पुलाचा लोखंडी कठडा तोडून थेड नदीपात्रात कोसळली.

ट्रेंडिंग न्यूज

हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला असून दरवाजे तुटून बाजुला पडले आहेत. या अपघातात एकाला जीव गमवावा लागला आहे. जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गंगापूर धरण, कशप्पी धरण या ठिकाणी अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी येत असतात. गेल्या दोन आठवड्यापासून जोरदार पाऊस बरसत असल्याने लोकांची धरण परिसरात गर्दी वाढत आहे. रात्रीच्या वेळी अशा गंभीर अपघाताच्या घटना घडतात. येथे गेल्या १५ दिवसातील हा तिसरा अपघात आहे.

मनमाड - मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा कासारा घाटात अपघात! -

मनमाड-कसारा घाटात रेल्वेचा अपघात झाला आहे. पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्याने हा अपघात झाला आहे. पंचवटी एक्सप्रेस इंजिनची एक बोगी कपलिंग तुटल्याने पुढे गेली. या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्न या मार्गावरील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. एक तास या मार्गावरची रेल्वेवाहतूक ही ठप्प झाली होती. पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग कसारा घाटात अचानक तुटली. अचानक झालेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर