Nashik stone pelting : नाशिकमध्ये शुक्रवारी बांगलादेशातील हिंदूच्या मुद्यावरून सकल हिंदू समाजातर्फे बंद पुकारण्यात आला होता. मात्र, जुन्या नाशकात या बंदला दोन गटात तुफान राडा झाला. दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यासाठी निघालेल्या रॅलीनंतर दोन गट आमनेसामने आले. दोन्ही गटाने एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. आज शनिवारी नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शांततेचे आवाहन केले आहे. तसेच शहरातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच हातात कुणी कायदा घेऊ नये असे देखील दादा भुसे यांनी म्हटलं आहे.
नाशिक येथे शुक्रवारी बांगलादेशातील हिंदूच्या प्रश्नाबाबत बंद पुकारण्यात आला होता. काही संघटनांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. मात्र, दोन गट समोरासमोर आल्याने वाद उफाळून आला आली मोठ्या प्रमाणात दगड फेक करण्यात आली. या घटनेत दोन पोलिस उपयुक्त देखील जखमी झाले. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या आज पालकमंत्री दादा भुसे यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, तसेच शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमानेम जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बैठीक दुपारी १.३० वाजता बोलावली आहे. तसेच त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा देखील त्यांनी घेतला आहे.
दादा भुसे यांनी शांतता राखण्याचे आवाहंन केले आहे. भुसे म्हणाले, कुणीही कायदा सुव्यवस्था हाती घेऊ नये. कायदा हातात घेऊन सलोखा बिघडेल असे वर्तन करू नये. प्रशासनाला सहकार्य करून शहराची शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावे तसेच समाज माध्यमांवर कुणीही अफवा पसरवू व नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.
काल झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देखील त्यांनी दिली आहे. या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची देखील संवाद साधला आहे. दरम्यान, शहरात तणावपूर्ण शांतता आहे. जागो जागो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.