Nashik Accident : कुंभमेळ्यासाठी रत्नागिरी येथून प्रयागराज येथे गेलेल्या भाविकांच्या ईनोव्हा गाडीला सिन्नर जवळ भीषण अपघात झाला. या अपघात निवृत्त प्राध्यापकासह तिघे जण ठार झाले. तर तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचा चक्काचूर झाला होता.
या अपघातात डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई, चालक भगवान उर्फ बाबू झगडे व रत्नागिरी येथील हॉटेल व्यवसायिक अक्षय निकम हे ठार झाले आहेत. तर तिघे जण जखमी झाले आहेत. हे सगळे रत्नागिरी खेडशी येथील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी येथून ७ जण हे महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले होते. हे सर्व जण परतीच्या मार्गावर होते. यावेळी नाशिक येथे त्यांच्या ईनोव्हा कारचा भीषण अपघात झाला. मृत सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत. जखमी किरण निकम यांची प्रकृती गंभीर आहे. तर संतोष रेडीज, रमाकांत पांचाळ व प्रांजल साळवी हे किरकोळ जखमी झाले आहेत.
रत्नागिरी माळ नाका येथील डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई, निवृत्त शिक्षक रमाकांत पांचाळ, रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज, सुप्रसिध्द ऑडीटर किरण निकम, त्यांचे चिरंजीव अक्षय निकम व नातेवाईक प्रांजल साळवी तसेच वाहन चालक भगवान तथा बाबू झगडे हे ७ जण प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. हे परतीचा प्रवास करत होते.
यावेळी त्यांची गाडी ही सिन्नर जवळ आली असता पहाटे ४ वाजता त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात इनोव्हा गाडीचा चक्काचुर झाला. कुंभमेळ्यातील शाही स्नान करून रत्नागिरीला परत येत होते. सिन्नर जवळ समोरुन येणार्या डंपरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यामुळे हा भीषण अपघात झाला. या मार्गावरील इतर वाहनचालकांनी त्यांना गाडीतून बाहेर काढले. व जखमींना दवाखान्यात भरती केली. दरम्यान, पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. व जखमींची माहिती घेतली.
संबंधित बातम्या