मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Accident : कुटुंबावर काळाचा घाला! मुंबई-आग्रा मार्गावर भीषण अपघात, चिमुकलीसह चार जण जागीच ठार
Nashik Accident
Nashik Accident

Nashik Accident : कुटुंबावर काळाचा घाला! मुंबई-आग्रा मार्गावर भीषण अपघात, चिमुकलीसह चार जण जागीच ठार

08 March 2023, 19:56 ISTShrikant Ashok Londhe

Nashik Accident : भरधाव कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून अपघातस्थळावरचे दृष्य हृदय पिळवटून टाकणारे होते.

Nashik Accident News : नाशिकजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकजवळ कारला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इगतपुरीतील पंढरपूरवाडीसमोर हा अपघात झाला. यामध्ये एका चिमुकलीसह चौघांचा मृत्यू झाला. 

ट्रेंडिंग न्यूज

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगात निघालेल्या कारचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला. टायर फुटल्यामुळे कार अनियंत्रित झाली व उडून समोरून येणाऱ्या टोइंग व्हॅनवर आदळली. टोइंग व्हॅन मुंबईहून नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर कार घेऊन जात होती. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी आहे. मृतांमध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मृत एकाच कुटूंबातील आहेत.

गाडी दुसऱ्या व्हॅनवर आदळल्यानंतर मोठा आवाज झाला व परिसरातील नागरिकांनी तिकडे धाव घेतली. भरधाव कारचा पुढच्या बाजुचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगी, एक महिला व दोन पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे. 

अपघातानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला करून वाहतूक सुरुळीत केली. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.अपघातस्थळावरील दृष्य हृदय हेलावणारे होते. दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला होता तसेच रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. 

विभाग