नाशिकमध्ये कार व मोटारसायकलमध्ये भीषण अपघात झाला आहे. नाशिकच्या घोटी-सिन्नर महामार्गावर उंबरकोन फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
या अपघातातील जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी घोटी पोलीस दाखल झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
घोटी - सिन्नर महामार्ग हा एक महत्वाचा रस्ता आहे. हा महामार्ग भाविक व पर्यटकांचा वर्दळीचा मार्ग आहे. शिर्डी, भंडारदरा व गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा सोईचा महामार्ग असल्याने वाहनांची वाहतूक व वर्दळ मोठ्या प्रमाणात चालू असते. हा रस्ता सोईचा असला तरी प्रवासासाठी मात्र धोकादायक ठरत आहे. या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेसवे रोज हजारो वाहने जात असतात. यात कार, बस आणि अजवड वाहनांची संख्या मोठी आहे. या मार्गावर अनेक वाहने ही वेगमर्यादा पाळत नाहीत. या मार्गावर काही ठिकाणी १०० किमी पेक्षा आत वेगमर्यादा बंधनकारक आहे. मात्र, ही वेग मर्यादा पाळली जात नाही. उलट १०० किमी पेक्षा अधिक वेगाने ही वाहने चालवली जातात. यामुळे या मार्गावर आपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत.
दरम्यान, अशा बेजबादार वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी आता या मार्गावर सिसिटीव्ही बसवण्यात आले आहे. दर दोन किमी अंतरावर हे सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या द्वारे १०० किमी पेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जाणार आहे. येथे असणारी स्पीड गण वाहनांचा वेग तपासून १०० किमी पेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवरुन थेट चलन पाठवणार आहेत. वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास त्यांना २ हजार रुपयांचा दंड होणार आहे. त्यामुळे या मार्गावर आता वेग मर्यादेचे बंधन पाळावे लागणार आहेत.