मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik: अवघ्या ८ महिन्यांच्या बाळाने गिळले नेलकटर, डॉक्टरांनी वाचवले प्राण

Nashik: अवघ्या ८ महिन्यांच्या बाळाने गिळले नेलकटर, डॉक्टरांनी वाचवले प्राण

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 20, 2022 01:59 PM IST

Nashik: खेळता खेळता ८ महिन्यांच्या बाळाने नेलकटर गिळल्याची घटना नाशिकमध्ये घडली. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत बाळाचे प्राण वाचवले.

बाळाने खेळता खेळता गिळलं नेलकटर
बाळाने खेळता खेळता गिळलं नेलकटर

Nashik: लहान मुलं खेळताना हाताला लागलेली एखादी वस्तू तोंडात घालतात. त्यातून अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. लहान मुलांच्या जीवाला धोकाही यामुळे निर्माण होतो. आता असाच एक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. नाशिक रोड परिसरात एका ८ महिन्याच्या बाळाने नेलकटर गिळल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरांमुळे बाळ सुखरुप वाचल्यानं पालकांचा जीव भांड्यात पडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिक रोड परिसरतील एका कुटुंबातल्या ८ महिन्याच्या बाळाने नेलकटर गिळलं. सुदैवाने ही गोष्ट बाळाच्या आईच्या लक्षात आली. त्यानंतर बाळाला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून नेलकटर काढलं. आता बाळाची प्रकृती व्यवस्थीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

बाळ घरात खेळत असताना त्याला नेलकटर सापडलं. बाळ फक्त ८ महिन्याचं असून त्यानं नेलकटर गिळल्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. आईच्या लक्षात हे येताच बाळाला नाशिकमधील आडगाव इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी बाळावर शस्त्रक्रिया करून नेलकटर बाहेर काढलं. सुदैवाने बाळाला कोणतीही इजा पोहोचली नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं.

लहान मुलं खेळत असताना त्यांच्या आजुबाजूला अनेक वस्तू पडलेल्या असतात. यात बाळाला इजा पोहोचतील अशा वस्तू तर नाहीत ना याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा अशा प्रकारच्या घटना घडून अघटित घडण्याची शक्यता असते. वेळेत अशा गोष्टी लक्षात न आल्यास बाळाच्या जीवाला धोकाही पोहोचू शकतो.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग