Narendra Bhondekar News: महायुती सरकारचा आज नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार झाला. महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर, अनेकांना डच्चू देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. मागील सत्ता स्थापनेच्या वेळी कोणत्याही अटी शर्ती विना मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. मात्र. यंदा मला मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात देऊन डावलले गेले. शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याचा मला पश्चाताप होत आहे. वेळ पडल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईल, असा इशारा भोंडेकर यांनी दिला आहे.
भोंडेकर म्हणाले की, 'गेल्या सरकारमध्ये १० अपक्ष आमदारांपैकी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारा मी पहिला आमदार होतो. महायुतीचे सरकार अस्तिवात येणार असल्याने मी कुठल्याही अपेक्षा न ठेवता शिंदेंसोबत गेलो. त्यावेळी मला महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होईल, तेव्हा मंत्रिपद देऊ, असे अश्वासन देण्यात आले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चर्चा झाली. पण मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. महायुतीचे सरकार येईल, तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. जाहीर सभेत याबाबत बोलणे झाले. असे असताना मागून आलेल्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाही, त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले', अशा शब्दात भोंडकर यांनी नाराजी व्यक्त केली.
आम्हाला उधारीचे पालकमंत्री नको, जिल्ह्याचा पालकमंत्री हवा, या भूमिकेसोबत आम्ही शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा भाजपमध्ये येण्यासाठी आग्रह होता. पण मी शिवसेनेत जाणे पसंत केले. पण मला आता शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप झाला आहे. आमचा अधिकार शिंदे साहेबांवर होता. त्यामुळे आम्ही शिवसेनेत गेलो. मात्र, शिंदे साहेबांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे वेळ पडल्यास मी आमदारकीचा राजीनामा सुद्धा देईल, असे भोंडेकर म्हणाले.
१) चंद्रशेखर बावनकुळे
२) राधाकृष्ण विखे पाटील
३) चंद्रकांत पाटील
४) गिरीश महाजन
५) अतुल सावे
६) गणेश नाईक
७) मंगलप्रभात लोढा
८) शिवेंद्रराजे भोसले
९) जयकुमार रावल
१०) पंकजा मुंडे
११) आशिष शेलार
१२) अशोक उईके
१३) जयकुमार गोरे
१४) संजय सावकारे
१५) नितेश राणे
१६) आकाश फुंडकर
१७) माधुरी मिसाळ
१८) मेघना बोर्डीकर
१९) पंकज भोईर
२०) शंभुराज देसाई
२१) उदय सामंत
२२) दादा भुसे
२३) गुलाबराव पाटील
२४) संजय राठोड
२५) संजय शिरसाट
२६) प्रताप सरनाईक
२७) भरत गोगावले
२८) प्रकाश आबिटकर
२९) आशिष जयस्वाल
३०) योगेश कदम
३१) हसन मुश्रीफ
३२) आदिती तटकरे
३३) बाबासाहेब पाटील
३४) दत्तात्रय भरणे
३५) नरहरी झिरवळ
३६) माणिकराव कोकाटे
३७) मकरंद जाधव-पाटील
३८) धनंजय मुंडे
३९) इंद्रनील नाईक
संबंधित बातम्या