मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narayan Rane : प्रभादेवी राड्यात आता राणेंची एंट्री; शेवटी महाराष्ट्रात रहायचं आहे, ठाकरेंना इशारा

Narayan Rane : प्रभादेवी राड्यात आता राणेंची एंट्री; शेवटी महाराष्ट्रात रहायचं आहे, ठाकरेंना इशारा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 12, 2022 06:25 PM IST

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यानप्रभादेवी येथेशिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये जोरदार राडाझाला होता. आता या वादात भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (NarayanRane) उतरले आहेत. नारायण राणे यांनीसदा सरवणकर यांच्या घरीभेट देऊन उद्धव ठाकरेंना इशारा दिला.

प्रभादेवी राड्यातआता राणेंची एंट्री
प्रभादेवी राड्यातआता राणेंची एंट्री

मुंबई–गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान प्रभादेवी येथे शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (sada saravankar) यांनी गोळीबार केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी सदा सरवणकर व समाधान सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राड्यातील शिवसैनिक मातोश्रीवर गेले होते तसेच सदा सरवणकर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र आता या वादात भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) उतरले आहेत. नारायण राणे यांनीसदा सरवणकर यांच्या घरीभेट दिली. 'मातोश्री'च्या दुकानात बसून फक्त तक्राराची मार्केटिंग सुरू आहे, असे हल्ले बिल्ले करू नका शेवटी महाराष्ट्रात आणि मुंबईत राहायचं आहे,असा इशाराच राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला आहे.

सदा सरवणकर यांच्या घरी भेट दिल्यानंतर राणे यांनीपत्रकारांशी बोलताना शिवसेनेवर टीका केली. राणे म्हणाले की, सदा सरवणकर माझे जवळचे सहकारी आहेत, कधीकाळी आम्ही एकत्र काम केले आहे. गणेश विसर्जना दिवशी जे घडले त्याची दखल घेणं आमचं काम आहे. शिवसेनेने तक्रार दिली असेल तर याची चौकशी होईल. सेनेला तक्रार करण्याशिवाय काही उरलं नाही, असा टोला राणेंनी लगावला. मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्राराची मार्केटिंग सुरू आहे असे हल्ले बिल्ले करू नका शेवटी महाराष्ट्रात आणि मुंबईत राहायचं आहे.  मुंबईत अशा प्रकारची लुटपुट चालू देणार नाही, असा इशाराही राणेंनी दिला. ५० लोक घराकडे मारायला पाठवता. मुंबईत शिंदे गटाची ताकद आहे की नाही, ते काळानुसार कळेल असंही राणे म्हणाले.

गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता दोन्ही गटातील संघर्ष शिगेला पोहचला असून शिवसैनिकांनी माहिम आणि दादरमध्ये आमदार सदा सरवणकर यांचे पोस्टर फाडले होते. याशिवाय आमदार सरवणकर यांच्या संपर्क कार्यालयांवर दगडफेकही केली होती. त्यामुळे आता शिवसेना आणि शिंदे गटात गणेश मिरवणुकीवरून सुरू झालेल्या वादाला हिंसक वळण लागले आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या