मालवणमधील राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमधील झालेल्या जोरदार राड्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. मालवणमधील राड्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या राड्याबद्दल नारायण राणे म्हणाले की, आम्ही काहीही केले नाही. आम्ही राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेलो होतो. आम्ही खाली येत असताना ते वर किल्ल्यावर जात होते. तेव्हा त्यांचे लोकच आमच्या अंगावर आले. आम्ही काहीच केले नव्हते. तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का? आम्हाला काही करायचे असतं तर आम्ही चिरीमिरी करत नाही. एकही घरापर्यंत पोहोचू शकला नसता. असे नारायण राणे यांनी म्हटले.
नारायण राणे म्हणाले की, यापुढे आमच्या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे,तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या,मी बघतो,घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन,सोडणार नाही,अशी थेट धमकी नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांसमोरच दिली आहे.
नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरें कडून काय अपेक्षा ठेवायची,ते शिवद्रोही आहे. शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन मुद्यांवर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं आहे. आतापर्यंत पैसे कमावले आहे. स्वत: च्या वडिलांचा पुतळा सुद्धा सरकारच्या पैशाने बनवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावरआरोप करण्याशिवाय या लोकांनी कोणतेही विधायक कार्य केलेले नाही. उद्धव ठाकरेंकडून चांगल्या भाषेची अपेक्षा नाही. शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व हे उदरनिर्वाहाचे साधन बनवले. जो पैसा कमवला, तो हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कमावला. एकतरी पुतळा उभारला का, स्वतःच्या वडिलांचा पुतळा भारत सरकारच्या खर्चाने बनवला. शिव्या घालणे या पलीकडे दुसरे काही कळत नाही.
मालवणमधील शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याचं विरोधक भांडवल करत आहेत. या जिल्ह्यात टीका करण्याशिवाय कोणतंही कारण भेटत नाही. शिवरायांचा पुतळा कोसळला म्हणून महाविकास आघाडीचे लोक टीका करत आहे. या जिल्ह्यात पुतळा तयार झाला,पण आज आलेले बाहेरून पुढारी लोक कधी महाराजासमोर नतमस्तक होण्यासाठी इथं आले नाही. याच्यामधील एखाद्याने तरी महापुरुषांचा पुतळा उभारला, शाळा सुरू केली असं काही काम केलं आहे का? पण कोणत्याही घटनेचं निमित्त करून राजकारण केलं जात असल्याची टीका राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली.