मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narayan Rane : ईडी तुमच्या मागे आहे, आदित्यही तुरुंगात जाणार, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Narayan Rane : ईडी तुमच्या मागे आहे, आदित्यही तुरुंगात जाणार, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

22 September 2022, 19:58 ISTShrikant Ashok Londhe

आता गटप्रमुख आठवले, अडीच वर्षात सत्तेत असताना त्यांनी किती गटनेत्यांना भेटी दिल्या, त्यांना मदत केली का? बापाचं धोरण न पाळू शकणाऱ्या मुलाची दशा पाहून आम्ही बाहेर पडलो, याला चोरी केली असं म्हणत नाहीत, असा हल्लाबोल नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

मुंबई - गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप खाल्लं असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे.उद्धव ठाकरे यांच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यातील भाषणाला उत्तर देण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. राणे म्हणाले की, तुम्ही अजून सुटला नाही, ईडी तुमच्या मागे आहे, आदित्यही सुशांत सिंह प्रकरणात तुरुंगात जाणार, असा इशाराही राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला.

ट्रेंडिंग न्यूज

उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी उद्धव ठाकरे जेमतेम सहा वर्षाचे होते. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कुणाला कानफाटीत तरी मारली का? पक्ष वाढीसाठी काही केलं का? आयत्या बिळावर ते नागोबा आहेत, थेट मुख्यमंत्री झाले. शिवसेना घडायला, वाढायला, सत्तेवर यायला शिवसैनिकांचा त्याग आहे, यामध्ये उद्धव ठाकरे वा आदित्य ठाकरे यांचा संबंध नाही. असा हल्लाबोल राणेंनी केली.

राणे म्हणाले की, आता गटप्रमुख आठवले, अडीच वर्षात सत्तेत असताना त्यांनी किती गटनेत्यांना भेटी दिल्या, त्यांना मदत केली का? बापाचं धोरण न पाळू शकणाऱ्या मुलाची दशा पाहून आम्ही बाहेर पडलो, याला चोरी केली असं म्हणत नाहीत. बाळासाहेब आयुष्यभर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत लढले, यांनी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे विचार मातीत घातले. देशाच्या मोठ्या नेत्यांना गिधाडं म्हणाले, हा लबाड लांडगा आहे. उद्धव ठाकरे यांच्याएवढा खोटारडा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही. युतीमध्ये असताना मला मंत्रीपद मिळू नये म्हणून उद्धव ठाकरे अमित शाह यांना फोन करत होते. अडीच वर्षात केवळ तीन तास हे मंत्रालयात बसले.