मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उरलेली काँग्रस आम्ही वाटून घेऊ, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर नारायण राणेंचे वक्तव्य

उरलेली काँग्रस आम्ही वाटून घेऊ, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर नारायण राणेंचे वक्तव्य

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 03, 2022 01:06 PM IST

Narayan Rane On Congress : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी काही राजकीय घडामोडींवरही भाष्य केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Narayan Rane On Congress : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे आणि नारायण राणे राज्यातील घडामोडींबाबत विचारलेल्या काही प्रश्नांना उत्तरे दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात अशोक चव्हाण भाजपला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली होती. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काँग्रेसबद्दल मी बोलत नाही. त्यांची फरफट तुम्ही पाहताय आम्ही कोणालाही रस्ता दाखवलेला नाही, जे आधी व्हायला हवं होतं ते आता झालंय.आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत"

शिवसेना आणि हिंदुत्वाचे विचार स्वीकारण्यासाठी काही लोक तयार असल्याची चर्चा आहे. त्यावर विचारले असता केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, "काँग्रेसचे नेते त्यांचे राहणार नाहीत मग, एकतर शिंदेंच्या ग्रुपमध्ये शिवसैनिक म्हणून जातील किंवा भाजपमध्ये जातील. तसंच उरलेली जी काँग्रेस आहे ती आम्ही वाटून घेऊ."

अशोक चव्हाण यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चेवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिलीय. अशोक चव्हाण यांच्याबद्दलचं वृत्त असत्य आणि खोडसाळपणा असल्याचं त्यांनी म्हटलं. लोकांची दिशाभूल करणारं हे वृत्त असून सध्या अशोक चव्हाण हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

IPL_Entry_Point