मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena Dasara Melava 2022 : खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, दसरा मेळावाही तेच घेणार – नारायण राणे

Shivsena Dasara Melava 2022 : खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, दसरा मेळावाही तेच घेणार – नारायण राणे

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 31, 2022 08:04 PM IST

खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असून त्यांच्या नेतृत्वातच यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

नारायण राणे
नारायण राणे

मुंबई – यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava 2022)  उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) घेणार की एकनाथ शिंदे (Eknath shinde) घेणार यावरून शिवसेनेत रणकंदन माजले आहे. दसरा मेळाव्यासाठी मुंबई पालिकेने अजून परवानगी दिलेली नाही, त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या परंपरेनुसार यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याची घोषणा केली. त्यातच या वादात आता नारायण राणे (Narayan rane) यांनी उडी घेतली असून खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असून त्यांच्या नेतृत्वातच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याचे म्हटले आहे. 

शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेत  एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट तयार असून खरी  शिवसेना कुणाची  तसेच पक्षाच्या निवडणूक चिन्हावर कुणाचा हक्क याचा निर्णय न्यायालयात प्रलबिंत आहे. 

महाराष्ट्रात ठाकरेंचा वारस म्हणजे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही, बाळासाहेबांचं काय गुण आहेत? जे घडलं ते योग्य घडलं. मी पण बंड केलं होतं. बंड करण्यामागे खूप कारणं आहेत. ते करावं लागतं, जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही त्याला काय करणार ?  खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे.  दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेचाच होणार, उद्धव ठाकरेंना विचार द्यायला काय आहे, त्याच्याकडे कोणते विचार आहेत? ते काय बोलणार? त्यामुळे एकनाथ शिंदे यांचाच मेळावा होणार असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी नारायण राणे म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वी महाराष्ट्रावरील विघ्न टळलं आहे. आता राज्य विकासाच्या मार्गावर घोडदौड करेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लोकांवर अन्याय होणार नाही. सुशांत राजपूत आणि दिशावर अत्याचार करून ठार मारण्यात आले. असले प्रकार यापुढे होणार नाहीत. सुशांत आणि दिशाची केस अजूनही संपली नाही. भविष्यात असं घडू नये म्हणून शिंदे सरकार निश्चितच प्रयत्न करेल. असे म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबतचा निर्णय मुंबई महापालिकेकडून प्रलंबित ठेवला आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कात जी नॉर्थ विभागाला दोन वेळा पत्र देऊनही महापालिकेने अर्ज अनिर्णीत ठेवला आहे. गणेशोत्सवानंतर यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. 

IPL_Entry_Point