Narayan Rane on Prakash Ambedkar : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यात ३ डिसेंबर नंतर दंगली होऊ शकतात असे म्हणत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, त्यांच्या या व्यक्तव्याचा भाजपचे नेते आणि म केंद्रीय लघू सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नारायण राणे यांनी प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. आज पुण्यात राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी वरील टीका केली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात दंगली होणार असल्याचे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. नारायण राणे त्यांच्या या व्यक्तव्याचा समाचार घेतांना म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात दंगली होऊ शकतात असे वक्तव्य केले होते. जर खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का असा सवळ करत राणे यांनी प्रकाश आंबेडकर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे असे म्हणाले. तसेच दंगलीचा आधार काय याची माहिती देखील त्यांना विचारला पाहिजे असे देखील राणे म्हणाले. आंबेडकर असो किंवा इतर कोणीही, दंगलीविषयी जर कुणी बोलत असेल तर, पोलिसांनी त्यांची माहिती घ्यावी. त्यांची चौकशी करून दंगली रोखण्यासाठी पावले उचलावी.
छगन भुजबळ यांच्या बाबत नारायण राणे यांनी बोलण्याचे टाळत छगन भुजबळांबाबत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावर उत्तर द्यायला कटिबद्ध नाही, असे म्हणाले. नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांच्यावर देखील टीका केली. जरांगे पाटील यांनी आधी आरक्षणाचा अभ्यास करावा त्यानंतर बोलावे. जरांगे पाटील हे वयाने लहान आहेत. मराठा समाज हा ओबीसीतून आरक्षण घेणार नाही असे देखील ठामपणे नारायण राणे म्हणाले.
नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांचा देखील समाचार घेतला. संजय राऊत खरच आक्रमक आहे का? तयांचे नाव घेऊ नका. राऊत कधी काय चांगले बोलले नाही. सरकार त्यांचे संरक्षण कधी काढणार याची वाट पाहतोय. आदित्य आणि संजय राऊत हे दोघेही जेलची हवा खाणार आहे, असे देखील राणे म्हणाले.
संबंधित बातम्या