Larvae Found in Anganwadi Poshan Aahar: पुण्यातील अंगणवाडीतील मुलांना मुदत संपलेली पोषण आहार सामग्री वाटप केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेला आठवडा उलटला नाही तोच नंदुरबार येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आळ्या आढळल्याची घटना समोर आली. नंदुरबारतील शहादा तालुक्यामधील मुबारकपूर येथील अंगणवाडीत ही घटना आहे. मात्र, यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुबारकपूर गावातील अंगणवाडीत मंगळवारी बालकांना पोषण आहाराचे पाकीट वाटण्यात आले. मात्र, या पोषण आहारात अळ्या आढळल्याची माहिती गावातील सरपंच ताईबाई राजेंद्र अहेर यांना मिळली. यानंतर अहेर यांनी तातडीने अंगणवाडीत जाऊन सर्व पोषण आहाराची प्रत्यक्ष पाहणी केली. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थेट म्हसावद बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला संपर्क करुन अंगणवाडीतील प्रकार सांगितला.
धक्कादायक बाब म्हणजे, अंगणवाडीतील मदतनीस महिलेने अळ्या असलेला हाच पोषण आहार शिजवण्यासाठी घेतला होता. मात्र, त्यांनी निरखून पाहिले असता त्यामध्ये आळ्या आढळून आल्या. पोषण आहारात आळ्या आढळून आल्याची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अंगणवाडी धाव घेऊन संताप व्यक्त केला.
सांगलीतील पलूस येथील अंगणवाडीत मुलांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची पाकीटात मृत साप आढळून आल्याचा प्रकार आढळून आला. या प्रकारामुळं मुलांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना अंगणवाडी केंद्रांमध्ये माध्यान्ह भोजनाची पाकिटे मिळतात, ज्यात दाल-चिखडी असते. दरम्यान, सोमवारी (१ जुलै २०२४) इथल्या एका मुलाला देण्यात पॅकेटमध्ये मृत साप आढळल्याचे पालकांचे म्हणणे आहे. हा प्रकार नेमका काय आहे? याबाबत सविस्तर कळू शकलेले नाही. धुळ्यातील पांझरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पोषण आहाराची रिकामी पाकीट आढळून आले. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाकीट आढळून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
संबंधित बातम्या