Nandurbar Accident : नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेल्या कोंडाईबारी घाटात एक भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात घुसल्याने तब्बल १०० मेंढ्या चिरडून ठार झाल्या आहेत. अपघातानंतर रस्त्यावर मेंढ्यांचे मृतदेह विखुरले होते. या घटनेमुळे मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून त्याला धक्का बसला आहे. या अपघातामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक ट्रक हा धुळ्याहून सुरतला जात होता. हा ट्रक नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर कोंडाईबारा घाटात आला. यावेळी काही मेंढपाळ हे रस्त्याच्या कडेने कळप घेऊन जात होते. मेंढ्यांचे मालक लखा गोविंदा गोईकर, बाळु सोमा गोईकर, दगडु गोईकर (रा.विजापूर ता.साक्री जि.धुळे) हे आपल्या शेकडो मेंढ्यांचा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरातला जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकवरील चलकांचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक मेंढ्यांच्या कळपात घुसला. यामुळे १०० हून अधिक मेंढ्या चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रक आंध्रप्रदेश राज्याकडून गुजरातला जात होता. तयार रमेश दुगंला (राजू) असे या ट्रकचालकाचे नाव आहे.
या घटनेनंतर रस्त्यावर मेंढ्यांचे मृतदेह विखुरले होते. या अपघातामुळे महामार्गावरील मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी मेंढ्यांचे मृतदेह बाजूला करून येथील वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे.
कोंडाईबारी घाटात अवघड वळणे आहेत. त्यामुळे या घाटात वारंवार अपघात होतात. येथील अपघात कमी करण्यासाठी अद्याप कोणत्याही उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत. आज झालेल्या आपघट्ट मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.
संबंधित बातम्या