Nandigram Express Fire : कसाऱ्याजवळ नंदीग्राम एक्स्प्रेसला आग, प्रवाशांची पळापळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nandigram Express Fire : कसाऱ्याजवळ नंदीग्राम एक्स्प्रेसला आग, प्रवाशांची पळापळ

Nandigram Express Fire : कसाऱ्याजवळ नंदीग्राम एक्स्प्रेसला आग, प्रवाशांची पळापळ

Nov 09, 2024 08:48 PM IST

Nandigram Express Fire : नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कोचला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. बोगीला आग लागल्यानंतर नंदीग्राम एक्स्प्रेस कसारा सिग्नल जवळ थांबवण्यात आली.

नंदीग्राम एक्स्प्रेसला आग
नंदीग्राम एक्स्प्रेसला आग

मुंबईजवळील कसाऱ्याजवळ एक्सप्रेसला आग लागल्याची घटना घडली आहे. रेल्वे रुळाच्या बाजूलाच गवताला आग लागल्याने नंदीग्राम एक्स्प्रेसला याचा फटका बसला आहे. एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर प्रवासी जीव मुठीत घेऊन खाली उतरले. अनेक प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या.

नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कोचला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. बोगीला आग लागल्यानंतर नंदीग्राम एक्स्प्रेस कसारा सिग्नल जवळ थांबवण्यात आली. एक्सप्रेसमधून प्रवास करणारे लोक सुखरूप असून या एक्स्प्रेसला रुळाशेजारी असलेल्या गवताला लागलेल्या आगीमुळे ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आगीच्या घटनेने एक्स्प्रेसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदीग्राम एक्सप्रेसच्या कॉम्प्रेसरला आग लागल्याची घटना घडली. नंदीग्राम एक्सप्रेसला आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य सुरू केले. पाण्याचा फवारा मारुन अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.

नंदीग्राम एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर ट्रेन कसारा जवळील सिग्नलजवळ थांबवली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. प्रवाशांना तातडीने एक्सप्रेसमधून उतरवण्यात आलं. या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर