मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanded Accident : मॉर्निग वॉकला गेल्यावर काळाचा घाला.. भरधाव वाहनाच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार

Nanded Accident : मॉर्निग वॉकला गेल्यावर काळाचा घाला.. भरधाव वाहनाच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार

Jan 12, 2024 10:15 PM IST

Nanded Road Accident : नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात पहाटे फिरायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

सध्या थंडीचे दिवस असून अनेक जण सकाळी फिरायला घराबाहेर पडत असतात. मात्र पहाटेच्या अंधारामुळे तसेच रस्त्यावरून चालताना अनेकदा अपघात होत असतात. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशीच एक घटना नांदेडच्या भोकर तालुक्यातून समोर आली आहे. येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. 

मुंबई-नांदेड महामार्गावर शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी येथे हा अपघात झाला. संकेत पाशेमवाड (वय १७) आणि वैभव येळने (१८)  अशी ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. भोसी गावातील संकेत व वैभव शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. दोघे मित्र शेतकरी कुटुंबातील आहेत. नांदेड-भोकर मार्गावरील भोसी गावाच्या महामार्गावरून हे दोन्ही विद्यार्थी चालत जात होते. पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दोघांना चिरडले, यात त्यांचा मृत्यू झाला. 

अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली मात्र धडक दिल्यानंतर वाहन चालकाने न थांबता तेथून पसार झाला. विद्यार्थ्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

घाटी रुग्णालयात रुग्ण व महिला डॉक्टरवरही रॉडनं हल्ला

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दोन गटांमध्ये गुरुवारी रात्री साठेआठ वाजताच्या सुमारास तुफान हाणामारी झाली. या घटनेत महिला डॉक्टरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी घाटी रुग्णालय प्रशासनाने रुग्णासह त्याच्यासोबत आलेल्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या चार कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर