मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain : नांदेडमध्ये मुसळधार.. ओढ्याच्या पुरात कार गेली वाहून, एकाचा मृत्यू

Maharashtra Rain : नांदेडमध्ये मुसळधार.. ओढ्याच्या पुरात कार गेली वाहून, एकाचा मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 20, 2022 04:48 PM IST

ओढ्याच्या पुरात कार वाहून चालकाचा मृत्यू झाला तर कारमधील४जण बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ही घटना घडली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड - नाशिक जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. (Nashik Flood) दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने काहीजण वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. ताज्या घटनेत ओढ्याच्या पुरात कार वाहून चालकाचा मृत्यू झाला तर कारमधील ४ जण बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ही घटना घडली आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथीलपाच तरुण लग्नाकार्यासाठी मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे आले होते. लग्न आटोपून लातूरकडे परतत असताना दापका राजा येथील ओढ्याच्या पुरात त्यांची कार अडकली. यामध्ये कारचालकाला बाहेर येता न आल्याने तो वाहून गेला. तर ४ जणांचा जीव वाचला.

 

कार पुलावरून जात असताना ओढ्याच्यापुलावर चिखल आणिपुराचेपाणीआल्यानेकार पुरात वाहून जाऊ लागली. पुरात कार वाहून जात असताना कारमध्ये बसलेले चार जण तात्काळ बाहेर आले. त्यांना स्थानिकांनी वाचवले. मात्र कार चालक बाहेर पडू शकला नाही. कारसह कार चालक वाहून गेला. आज कार ओढ्यात मिळून आली. यात कार चालक अजहर सत्तार शेख याचा मृत्यू झाला. कारमध्येच त्याचा मृतदेह आढळला. ग्रामस्थ आणि प्रशासनाने कार पाण्यातून बाहेर काढली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग