Nanded News : पोहायला गेलेल्या चार मित्रांचा खदाणीत बुडून मृत्यू; नांदेडमधील हृदयद्रावक घटना-nanded news 4 people death after drowning in quarry at zari village ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanded News : पोहायला गेलेल्या चार मित्रांचा खदाणीत बुडून मृत्यू; नांदेडमधील हृदयद्रावक घटना

Nanded News : पोहायला गेलेल्या चार मित्रांचा खदाणीत बुडून मृत्यू; नांदेडमधील हृदयद्रावक घटना

Aug 06, 2024 04:14 PM IST

Nanded News : नांदेडमधील पाच मित्र खदाणीजवळ पोहायला गेले होते. त्यावेळी त्यांना पोहण्याचा मोह झाला. पाच जण खदाणीच्या पाण्यात उतरले मात्र त्यातील चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

पोहायला गेलेल्या चार मित्रांचा खदाणीत बुडून मृत्यू
पोहायला गेलेल्या चार मित्रांचा खदाणीत बुडून मृत्यू

नांदेडमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोहण्यासाठी खदाणीत उतरलेल्या पाच जणांपैकी चार मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून दोघांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्तकेली जातआहे. नांदेड शहराजवळच्या झरी गावातील शिवारात ही घटना घडली.

काझी मुजममिल, अफान, सय्यद सिद्दीकी आणि शेख फुजायल अशी मृत्यू झालेल्या चार जणांची नावे आहेत. हे सर्व तरुण नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात राहणारे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमधील पाच मित्र खदाणीजवळ पोहायला गेले होते. त्यावेळी त्यांना पोहण्याचा मोह झाला. पाच जण खदाणीच्या पाण्यात उतरले मात्र त्यातील चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. या घटनेत एकजण सुखरुप बचावला आहे. या चौघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे.

नांदेड शहराच्या जवळ असलेल्या झरी गावात ही घटना घडली. या शिवारात मोठी खदाण आहे. या खदाणीत पोहण्यासाठी पाच तरुण गेले होते. पोहताना खदाणीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पाचपैकी चार मित्र बुडाले.यामध्ये चौघांचाही बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. मृत तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

तुतारी एक्स्प्रेसमध्ये बॅगमध्ये आढळला रक्तानं माखलेला मृतदेह -

एक व्यक्ति स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ११ वर दोन प्रवासी हे ट्रॅव्हल ट्रॉली बॅग घेऊन जात होते. हे दोघेही तुतारी एक्सप्रेसने प्रवास करणार होते. मात्र, रेल्वे पोलिसांची त्यांच्या बॅगेवर नजर गेली. त्यांनी दोघांना थांबले व बॅगेची पाहणी केली तर त्यांना हादरा बसला. या बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह पोलिसांना सापडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्यांनी एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह हा कोकणात विल्हेवाट लावण्यासाठी ते तुतारी एक्सप्रेसमधून घेऊन जात होते.अर्शद अली सादिक अली शेख (वय ३०) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा मृतदेह आरोपींनी बॅगेत कोंबला होता. शिवजित सिंग आणि प्रवीण चावडा असे आरोपींची नावे असून दोघेही मुकबधिर असल्याची माहिती आहे

विभाग