laborers Died Nanded : नांदेडमध्ये गटाराचे चेंबरसाफ करत असतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  laborers Died Nanded : नांदेडमध्ये गटाराचे चेंबरसाफ करत असतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

laborers Died Nanded : नांदेडमध्ये गटाराचे चेंबरसाफ करत असतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

Apr 05, 2024 07:15 AM IST

Three worker Died due to suffocation in Nanded : नांदेड (Nanded News) येथे धक्कादाय घटना घडली आहे. शहरातील गटाराचे चेंबर साफ करत असतांना, तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

नांदेडमध्ये गटाराचे चेंबरसाफ करत असतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू
नांदेडमध्ये गटाराचे चेंबरसाफ करत असतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

Three worker Died due to suffocation in Nanded : नांदेड येथे मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. शहरातील गटाराचे ड्रेनेज साफ करत असतांना गुदमरून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन कर्मचारी ड्रेनेजमध्ये उतरले असता, त्यांचा श्वास गुदमरल्याने ते तडफडत होते. यावेळी, त्यांना वाचवण्यासाठी तिसरा कर्मचारी आत उतरला असता, त्याचाही श्वास कोंडल्याने तिघांचाही मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी नांदेड शहरातील मालटेकडी (Nanded Maltekadi Area) भागात घडली. या घटनेमुळे सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात ऊन पावसाचा खेळ! उष्णतेच्या लाटेसह 'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा

शंकर वरसवाड (वय ३५), राजू पुयड (वय २५), गजानन पूयड (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तीन सफाई कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील मालटेकडी भागात महापालिकेचे मलशुद्धीकरण केंद्र असून हे केंद्र खाजगी कंत्राटदारा मार्फत चालवण्यात येत आहे. येथे असणाऱ्या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गाळ साचला होता. हा गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

Amethi lok sabha : अमेठीतून गांधी कुटूंबाचा उमेदवार ठरला!, स्मृती इराणींना देणार कडवी टक्कर

गाळ काढण्यासाठी आधी शंकर वरसवाड व राजू पुयड हे दोघे ड्रेनेजच्या चेंबरमध्ये उतरले. मात्र, चेंबरमधील गॅसमुळे त्यांचा श्वास गुदमरला. त्यांचा जीव कासावीस होऊ लागण्याने ते तडफडू लागले. ही घटना त्यांचा तिसरा सहकारी गजानन पूयड यांच्या लक्षात आली. दोघांनी बाहेर काढण्यासाठी गजानन देखील चेंबर मध्ये उतरला. मात्र, त्याचाही श्वास गुदमरूल्याने तिघेही बेशुद्ध होऊन चेंबरमध्ये पडले. ही बाब घटनास्थळी उपस्थितीत असलेल्या इतक कर्मचाऱ्यांनी पहिली. त्यांनी तातडीने तिघांनाही ड्रेनेजमधून बाहेर कडून त्यांना जवळील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

Mumbai Coastal Road : लोकार्पणानंतर काही दिवसातच कोस्टल रोड बोगद्यात पहिल्या अपघाताची नोंद; Video Viral

ठाण्यातही टाकी साफ करत असतांना तीन कामगारांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. येथील अंबरनाथ येथे जांभूळ गावात पाण्याची टाकी साफ करत असतांना विजेच्या शॉक लागल्याने तीन कामगार ठार झाले. टाकी साफ करत असताना त्यांना विजेचा धक्का लागला. हा धक्का जोरदार लागल्याने तीन कर्मचारी कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डोकरांनी घोषित केले.

कामगारांच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या दोन्ही घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या ही वर्षात या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कामगारांच्या हक्कासंदर्भात अनेकांनी आंदोलन केले. मात्र, आजही या बाबत काहीही उपाय योजना झालेली नाही.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर