Nanded Bypoll Election Result 2024 : नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत काँग्रेस उमेदवार रविंद्र चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांचा १४५७ मतांनी पराभव केला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत भाजप उमेदवार ३५ हजार मतांनी आघाडीवर होते. मात्र शेवटच्या फेरीत मोठी उलथापालथ झाली व अटीतटीच्या मुकाबल्यात रविंद्र चव्हाण यांनी विजय मिळवला व काँग्रेसने आपला जागा काय़म ठेवली. चव्हाण यांना ५८६७८८ मते मिळाली तर भाजपचे हंबर्डे यांना ५८५३३१ मते मिळाली.
वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या स्थानावरी राहिली. वंचितचे उमेदवार अविनाश विश्वनाथ भोसीकर यांना ८०१७९ मते मिळाली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जोरदार प्रदर्शनानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा उल्लेख केला.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायतीची सुनामी आली असून महाविकास आघाडी चारी मुंड्या चीत झाली आहे. भाजपच्या नेतृत्वातील महायुती राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली होती.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजयाबरोबरच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. संतुक राव हंबर्डे यांचा निसटता पराभव झाला आहे.
काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा सुमारे ६० हजार मतांनी पराभव केला होता.
मे २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नांदेड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण विजयी झाले होते, त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. मात्र अवघ्या तीन महिन्यात २६ ऑगस्टला वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली होती यात काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, तर भाजपाकडून त्यांच्याविरोधात डॉ. संतुकराव हंबर्डे उमेदवार होते. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत एकूण १९ उमेदवार होते मात्र मुख्य लढत काँग्रेस, भाजप व वंचितमध्ये होती. यात काँग्रेसने बाजी मारली आहे.