नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांचा विजय! अटीतटीच्या लढतीत १४५७ मतांनी खेचून आणला विजय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांचा विजय! अटीतटीच्या लढतीत १४५७ मतांनी खेचून आणला विजय

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांचा विजय! अटीतटीच्या लढतीत १४५७ मतांनी खेचून आणला विजय

Nov 24, 2024 12:05 PM IST

Nanded Loksabha Election : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत अतिटतीच्या लढतीत शेवटच्या क्षणी मोठा उलटफेर झाला. सुरवाती पासून मागे असलेल्या काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांनी १४५७ मतांनी विजय मिळवला.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांचा विजय! अतितटीच्या लढतीत केवळ १४५७ मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांचा विजय! अतितटीच्या लढतीत केवळ १४५७ मतांनी विजय खेचून आणला

Nanded Loksabha Election : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. मात्र, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल पाहायाला मिळाला. चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेस उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी काही मोजक्या मतांनी विजय मिळवला. रवींद्र चव्हाण हे दिवसभर मतमोजणीत मागे होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात त्यांनी पुन्हा स्पर्धेत येत केवळ १४५७ मतांनी विजय मिळवला.

वसंत चव्हाण यांनी २०२४च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत विजय मिळवला होता. मात्र, निवडणूक झाल्यानंतर अवघ्या ४ महिन्यांत त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीसोबतच येथील पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीचा निकाल देखील शनिवारी जाहीर झाला. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत रवींद्र चव्हाण हे मागे होते. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत महायुतीचे अनेक उमेदवार विजय मिळवत होते. रवींद्र चव्हाण हे मते असल्याने ही जागा भाजपच्या परड्यात पडणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये रवींद्र चव्हाण यांनी हा डाव फिरवला. आणि काही मतांनी हा विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊ जागा महायुतीने जिंकल्या. मात्र लोकसभेची पोट निवडणुक काँग्रेसने बाजी मारली आहे.

निवडून आल्यावर काय म्हणाले रवींद्र चव्हाण ?

निवडून आल्यावर रवींद्र चव्हाण म्हणाले, मी नांदेडच्या जनतेचे आभार मानतो. स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या आशीर्वाद व जनतेची साथ यामुळे माझा विजय झाला आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या सर्व जागा महायुतीला गेल्या. मात्र काँग्रेसच्या पडत्या काळात स्वर्गीय वसंत चव्हाण यांनी गड राखला होता. त्यामुळे जनतेने आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला साथ दिली. आता माझ्यावर मोठी जबाबदारी आहे, असे चव्हाण म्हणाले.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर