मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanded Crime : माता तू न वैरिणी ! ५० हजारांची सुपारी देऊन आईनेच काढला पोटच्या मुलाचा काटा

Nanded Crime : माता तू न वैरिणी ! ५० हजारांची सुपारी देऊन आईनेच काढला पोटच्या मुलाचा काटा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 19, 2022 01:18 PM IST

Mother killed her own son : मुलाच्या दारूच्या व्यसणाला कंटाळून आपल्या सख्या मुलाला ५० हजार रुपयांची सुपारी देऊन ठार मारल्याच्या प्रकार नांदेड जिल्ह्यातील बारड इथे उघडकीस आली आहे.

Maharashtra Crime News
Maharashtra Crime News (HT_PRINT)

नांदेड : कुठल्याही आईचे आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम असते. ती त्यांना काहीच होऊ देत नाही. तसेच प्रत्येक संकटातून ती आपल्या मुलाला कायम वाचवत असते. मात्र, नांदेड जिल्ह्यातील बारड इथे आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका आईने आपल्या दारुड्या मुलापासून सुटका मिळवण्यासाठी आईनेच ५० हजार रुपयांची सुपारी देत त्याचा काटा काढला आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी घडली.

सुशील श्रीमंगले असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑगस्ट रोजी त्याचा खून झाला होता. पोलिसांनी आपली तपासची चक्रे फिरवत या घटनेच्या मुळाशी गेले. या तपासात आईनेच आपल्या मुलाची हत्या केल्याचे पुढे आले आहे.

आई शोभा श्रीमंगले असे आरोपीचे नाव आहे. राजेश गौतम पाटील आणि त्याचा मित्र विशाल देवराव भगत यांनी सुपारी घेऊन सुशीलचा खून केला. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील हा नेहमी दारू प्यायचा. तो घरी येऊन आई वडील दोघांनाही मारहाण करायचा. तसेच कायम दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करायचा. यामुळे आईनेचे या त्रासाला कंटाळून त्याला ठार करण्याचे ठरवले. यासाठी तिने त्यांच्या घरी भाड्याने राहण्याऱ्या राजेश गौतम पाटील आणि त्याचा मित्र विशाल देवराव भगत यांना सुशीलला मारण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी देऊन सुशीलचा खून करण्यास सांगितले. १५ ऑगस्ट रोजी बारड शिवारात कॅनॉलच्या शेजारी दोघांनी सुशील त्र्यंबकराव श्रीमंगले याचा खून केला. त्याचा मृतदेह सापडला होता. पोलिस घटनास्थळी येत मृतदेहाचा पंचनामा त्यांनी केला. या ठिकाणी सुशीलच्या गळ्यावर व्रण आढळूले. त्याला डोक्यावर मारहाण करण्यात आलेल्या जखमा आढळून आल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सुशील श्रीमंगले याच्या खूनचा तपास करण्यात आला. दरम्यान तपासात पोलिसांत सुशील हा मजूर असल्याचे कळले. गुन्हे शाखेने याचा तपास आपल्याकडे घेत चौकशी करण्यास सुरुवात केली. ही चौकशी करताना पोलिस त्याच्या घरी पोहचले. दोन्ही भाडेकरुंची पोलिसांनी चौकशी केली. यात या खूनाचा प्रकार उघडकीस आला. सुशील श्रीमंगले हा दारू पिऊन आई वडिलांना मारहाण करायचा. यामुळे सुशीलच्या आईनेच त्या दोघांना ५० हजार रुपये देऊन ठार मारले. दोघांनीही सुशीलला बारड परिसरात कालव्या जवळ नेले आणि त्या ठिकाणी त्याचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

WhatsApp channel

विभाग