मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanded Crime : ६ वर्षाच्या चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या, मुदखेडमध्ये खळबळ

Nanded Crime : ६ वर्षाच्या चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या, मुदखेडमध्ये खळबळ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 16, 2024 08:37 PM IST

Nanded crime News : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका सहा वर्षीय चिमुकलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे व मृतदेह झुडुपात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 

मुदखेडमधील एका गावातील सहा वर्षाची चिमुकली रविवार (१४ जानेवारी)  दुपारपासून घरातून बेपत्ता झाली होती. मुलगी सायंकाळपर्यंत घरी न आल्याने कूटूंबीयांना परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर तिच्या पालकांनी मुदखेड पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. रात्रभर शोधूनही मुलगी सापडली नाही. 

दुसऱ्या दिवशी सकाळी चिमुकलीचा मृतदेह मुदखेड ऊमरी रस्त्याशेजारी एका झुडुपात आढळला. बेपत्ता मुलगी मृतावस्थेत आढळल्याने कुटूंबाला मोठा धक्का बसला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. 

चिमुकलीचा मृतदेह गावापासून जवळपास १२ किमी दूर एका झुडुपात आढळला. मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून संशयित आरोपींकडे चौकशी केली जात आहे. 

दरम्यान मंगळवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मृत मुलीच्या गावात जाऊन कुटुंबाची भेट घेतली. ही घटना अतिशय चीड निर्माण करणारी असून पोलीसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेतली. 

WhatsApp channel