नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण (mpvasant Chavan) यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला हलवण्यात आलं आहे. वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना पुढील उपचारासाठी हैदराबादमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहेसध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांना मंगळवारी दुपारी अचानक श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. ही बाब लक्षात येताच कुटुंबातील लोकांनी त्यांना नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
श्वास घेण्यास अडचण येतअसल्याने तसेचअचानकरक्तदाब कमी झाल्याने खासदार वसंत चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नांदेडच्या लाईफकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (१३ ऑगस्ट)दाखल करण्यात आले.मात्र,आता त्यांना पुढील उपचारासाठी एअर ॲब्युलन्सद्वारे हैदराबादलाहलवले.
हैदराबादच्या किम्स हॉस्पिटलमध्ये वसंत चव्हाण यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. नांदेड विमानतळावरून एअरअॅम्ब्युलन्सने खासदार वसंत चव्हाण यांना हैदराबादला नेण्यात आलं. त्यांना तेथील रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी सर्व व्यवस्था व तयारी करण्यात आली होती.
वसंत चव्हाण खासदार होण्याआधी अपक्ष म्हणून आमदारकीची निवडणूक जिंकले होते. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांची प्रकृती बिघडल्याची बातमी नांदेडमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यांचे समर्थक त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वसंत चव्हाण यांनी नांदेड मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी विद्यमान खासदार व भाजपचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना पराभूत केले होते. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला कमकुवत झाल्याचे बोलले जात होते. मात्र अशोक चव्हाणांच्या वर्चस्वाला हादरे देत वसंत चव्हाण यांनी नांदेड मतदारसंघातून विजय खेचून आणला होता.