मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यातील महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

राज्यातील महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

Jun 11, 2024 09:12 PM IST

Congress meet governor : काँग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ, पाणी टंचाई, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच महायुतीचे सरकार बरर्खास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही काँग्रेसने केली.

काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

आज काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन राज्यातील विविध समस्यांवर चर्चा केली. तसेच दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि टंचाईग्रस्त भागात पिण्याचे पाणी पुरवण्याची मागणी राज्यपालांकडे केली. राज्यातील जनता दुष्काळात होरपळत असतानामहायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यातराज्यात २६७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे या सरकारला सत्ते राहण्याचा अधिकार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ, पाणी टंचाई, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. आता निवडणुका संपल्यानंतरही शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना झालेल्या नाहीत. DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते, बियाणे, औषधे दिलेली नाहीत. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले. सरकारने राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत. त्यामुळे महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली आहे.

राज्यपालांना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना सरकार सुट्टीवर गेले होते तर काही मंत्री परदेशात गेले होते. मंत्र्यांना परदेशात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. या मंत्र्यांनी कोणाची परवानगी घेतली, याचा खुलासा झाला पाहिजे. शेतकरी संकटात सापडलेल्या आहे, त्याला आधाराची गरज आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. राज्यात खतांचा काळाबाजार सुरु आहे. खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावे अशी मागणी

संसद परिसरातील पुतळे हटवल्यावरून काँग्रेस आक्रमक -

काँग्रेसने म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे आमचे दैवत आहेत. संसद परिसरात असलेल्या या दैवतांचे पुतळे भाजपा सरकारने काढले आहेत त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून याबाबत राष्ट्रपती महोदयांना आमच्या भावना कळवल्या आहेत. आमच्या महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही असंही नाना पटोलेंनी म्हटलं.

टी-२० वर्ल्डकप २०२४