- गळा आवळून केला खून, पोलिसानी केली तिघांना अटक, घटनेची सखोल चौकशीची अंनिसची मागणी
वर्धा : जादूटोणा करत एका तरूणाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात उघडकीस आली आहे. तिन मांत्रीकांनी तांत्रिक विद्येचा उपयोग करत या तरुणाचा गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी मुलाचे वडील गणेश सोनकुसरे (रा. बेलपुरा, अमरावती) यांनी तक्रार दिली आहे त्यानुसार अब्दुल रहीम अब्दुल मजीद, अब्दुल जुनाईद, अब्दुल जमीर अब्दुल रहीम या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्वी येथे राहणारे फिर्यादी गणेश सोनकुसरे हे त्यांच्या मोठ्या मुलगा आजारी असल्याने त्याचा आजर दूर करण्यासाठी बुधवारी (दि १८) आर्वीतील विठ्ठलवार्ड परिसरात राहणा-या या तिघांकडे नेले. या तिघांनी ही संधी साधत काही मंत्रोपचार करत सोनकुसरे यांच्या मुलाचा गळा आवळला. त्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांना माहिती न देता मृतदेह सोनकुसरे यांच्या हवाली केला. दरम्यान सोनकुसरे यांचा मुलगा अचानक केल्याने ते हादरले. त्यांनी गुरूवारी (दि १९) या प्रकरणी अमरावती येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ तिन्ही आरोपींना अटक केली. दरम्यान पुढारलेल्या महाराष्ट्रात अशा घटना आजही होते हे धक्कादायक आहे. या प्रकरणी अखील भारतीय अंनिसचे राज्य संघटक पंकज वंजारे यांनी या घटनेची संखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. वंजारे यांनी, या घटनेतील बाबा, मांत्रिकांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. कारण त्यातून अनेक धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते. यात अंनिसचे संपूर्ण सहकार्य असेल. असेही ते म्हणाले.
आर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोळुंके यांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी नेले. दरम्याम शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याच्या खुणा दिसून येत आहेत.