Mumbai Local Viral Video: मुंबई एसी लोकलच्या महिला डब्यात एक व्यक्ती नग्नावस्थेत चढला, ज्यानंतर महिलांना शरमेने मान खाली घालावी लागली. एका प्रवाशी महिलेने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर शेअर केला. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकावरील आहे. महिलांच्या डब्यात नग्नावस्थेत चढलेला व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.
दरम्यान, सोमवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने निघालेली एसी लोकल घाटकोपर रेल्वे स्थानकावर पोहोचली असता मनोरुग्ण नग्नावस्थेत महिलांच्या डब्यात चढला. त्याला पाहून महिलांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. संभाव्य धोका लक्षात घेता मोटर मनने लोकल घाटकोपर स्थानकावर थांबवून ठेवली. त्यानंतर बाजूच्या डब्यात असलेल्या टीसीने मनोरुग्णाला धक्का देऊन बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या घटनेमुळे मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वेळीच टीसी घटनास्थळी पोहोचला नसता तर काहीही घडू शकले असते. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षतेसाठी आता काय पाऊल उचलले जातात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
संबंधित बातम्या