मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur ZP : नागपूर जि.प. सर्वसाधारण सभेत तुफान राडा; माईक व साहित्य हवेत भिरकावले, बाकांची तोडफोड

Nagpur ZP : नागपूर जि.प. सर्वसाधारण सभेत तुफान राडा; माईक व साहित्य हवेत भिरकावले, बाकांची तोडफोड

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 06, 2022 12:10 AM IST

Nagpur zilla parishad general meeting : नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांची पहिलीच सर्वसाधारण सभा प्रचंड वादळी ठरली. भाजपच्या सदस्यांनी सभागृहात राडा करत साहित्याची तोडफोड केली. त्यांना सत्ताधारी काँग्रेसच्या सदस्यांनीही साथ दिली.

नागपूर जि.प.
नागपूर जि.प.

नागपूर – नागपूर जिल्हा परिषदेतील आज आयोजित सर्वसाधारण सभा खूपच वादळी ठरली. सर्व साधारण सभेच्या ठरलेल्या अजेंड्यावरील विषयांवर चर्चा न करताच विषय मंजूर केल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी केल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी भाजपच्या संतप्त सदस्यांनी सभागृहातील साहित्य व कागदपत्रे हवेत फिरकावली अने बाकांची व माईकची तोडफोड केली. नागपूर जिल्हा परिषदेत नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नव्या विषय सभापतींनी कार्यभाराची सूत्रे हातात घेतल्यानंतर आजची पहिलीच सभा वादळी ठरली.

नुकत्याच जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारल्यानंतर आज पहिलीच सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या या बैठकीत अनेक विषय मंजुरीसाठी असल्याने ही बैठक वादळी होणार याचा आधीपासूनच अंदाज लावला जात होता. अनेक मुद्यांवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये बाचाबाची होण्याची शक्यता होती. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी घोटाळे व स्थगितीचा मुद्दा उपस्थित करण्याची रणनिती विरोधकांची होती. पदे वाटपातही वरिष्ठांना डावलल्याचा राग होता. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसला विरोधक भाजपसह स्वपक्षीयांच्या रोषाचाही सामना करावा लागला. भाजपच्या सदस्यांना काँग्रेसचे बंडखोर नाना कंभाले यांनी साथ दिली.

दरम्यान नागपूर जिल्हा परिषदेत भाग्यश्री विसपुते यांची नुकतीच बदली झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आज त्यांचीही पहिलीच सर्वसाधारण सभा होती. मात्र सभागृहात गोंधळ सुरु असताना त्या जागेवरच बसलेल्या दिसून आल्या. तसेच सुरु असलेल्या गोंधळावर त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग