Nagpur Murder News: नागपुरातील (Nagpur) सीताबर्डी परिसरात (Sitabuldi) बुधवारी झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. या घटनेला काहीच तास झाले असता शांतीनगर पोलीस ठाण्याच्या (Shantinagar Police Station) हद्दीतील भारतीय आखाडा परिसरात पैशांच्या वादावरून दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
विजय चव्हाण असे भोकसून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी हर्षल कातळे नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याचा साथीदार सागर यादवचा शोध सुरू आहे. आरोपी सागर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ला असे सुमारे ११ गुन्हे दाखल आहेत. आरोपी सागरने सुजल नावाच्या तरुणामध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद होता. याच वादातून सुजल त्याचा मित्र विजय चव्हाण आणि दोन मित्रासोबत सागरच्या घरी गेले. दरम्यान, दोन गटात हाणामारी झाली. त्यावेळी सागरने त्याच्या जवळील चाकूने विजयला भोकसले. या हल्ल्यात सागरचा जागीच मृत्यू झाला.
या हत्येची माहिती मिळताच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा हर्षलला अटक केली. सागर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारींच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे.
पालघर जिल्ह्यात आपल्या सहकाऱ्याची हत्या करून सुमारे तीन दशकांपासून फरार असलेल्या एका व्यक्तीला गुजरात राज्यातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. हरेश बाबू पटेल उर्फ नायिका (वय,५५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी २९ वर्षांपूर्वी मोहन सुकूर दुबली (वय, ५०) याची हत्या करून फरार झाला होता.दोघेही पालघरमधील सफाळेजवळील जीवदानीपाडा येथे एका बांधकाम साइटवर गवंडी म्हणून काम करत होते. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला. ज्यामुळे हा धक्कादायक प्रकार घडला. हत्येच्या २९ वर्षानंतर आरोपीला अटक करण्यात आल्याने अनेकजण पोलीस प्रशासनाकडे बोट दाखवत आहे.