मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur: दोघांचं एकाच मुलीवर जडलं प्रेम; स्पर्धा संपवण्यासाठी मित्रालाच संपवलं, नागपुरातील घटना

Nagpur: दोघांचं एकाच मुलीवर जडलं प्रेम; स्पर्धा संपवण्यासाठी मित्रालाच संपवलं, नागपुरातील घटना

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Aug 29, 2023 04:42 PM IST

Nagpur Murder: नागपुरातील हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मुलाने प्रेमप्रकरणातून मित्राची चाकू भोसकून हत्या केली.

Crime
Crime

Nagpur Crime: नागपुरातील हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमाच्या प्रकरणातून एका मित्राची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

शशांक तिनकर (वय, १७) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, बादशाह ऊर्फ सौरभ पंधराम (वय, १९) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. मृतक आणि आरोपी एकाच महाविद्यालयात शिकत होते. दोघांचेही एकाच मुलीवर प्रेम जडले. त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत असे. हा वाद मिटवण्यासाठी शशांकचा मित्र मौसम रामटेके पुढाकार घेतला. दरम्यान, बादशहाने शशांकला सोमवारी रात्री आठ वाजता डोंगरगाव परिसरात वाद मिटविण्यासाठी चर्चा करण्यास बोलावले. शशांक आणि मौसम हे डोंगरगाव परिसरात गेले.

त्यावेळी मौसमने वाद मिटवण्यासाठी चर्चा सुरु केली असता बादशाहने आणि त्याच्या मित्रासह मौसमला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे राग अनावर झाल्याने शशांकने बादशाहच्या कानशिलात लगावली. त्यानंतर हा इतका पेटला की, बादशाने शशांकवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात शशांक गंभीर जखमी झाला आणि काही मिनिटातच रक्ताच्या थारोळ्यात पडला.

शशांकला अशा अवस्थेत पाहून घाबरलेल्या मौसमने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर मौसमने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. शशांकला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारपूर्वी शशांकचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी बादशहा पंधरामसह साथिदारांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.

WhatsApp channel